VNMKV Parbhani Agrowon
ॲग्रो विशेष

VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’मध्ये गाजर गवत निर्मुलन जागरूकता मोहीम

Team Agrowon

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषी कीटकशास्त्र विभाग यांच्यातर्फे शुक्रवार (ता. १६) ते गुरुवार (ता. २२) या कालावधीत गाजर गवत निर्मुलन जागरूकता मोहीम राबविण्यात आली.

कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरातील सोयाबीन संशोधन प्रक्षेत्र, रेल्वे लाईन, खानापूर ब्लॉक आदी ठिकाणच्या गाजरगवतावर झायगोग्रामा भुंगे (मेक्सिकन बिटल) सोडून जैविक नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पी. आर. झंवर, परोपजीवी शास्त्रज्ञ डॉ. श्रद्धा धुरगुडे, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. डी. आर. कदम, डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. ए. जी. लाड, डॉ. फारिया खान, सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एच. डब्लू. आवारे, गणेश खरात, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश म्हात्रे, धनंजय मोहोड, धीरेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.

डॉ. नेहरकर म्हणाले, की झायगोग्रामा भुंग्याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न करता गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू शकतो. या भुंग्याची संख्या मोठया प्रमाणात नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे वाढत राहते.विद्यापीठात उपलब्ध झायगोग्रामा भुंगे शेतकऱ्यांनी नेऊन त्यांच्या शेतात तसेच गाव परिसरात सोडावेत.

परोपजीवी कीटक संशोधन योजनेतील प्रयोगशाळेत मेक्सिकन भुंग्याचे मोठ्या प्रमाणावर गुणन केले जाते. शेतकऱ्यांना नाममात्र दरात ते उपलब्ध करून देण्याचे काम मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. शेतकऱ्यांनी हे भुंगे खरेदीस दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी सुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ह्या भुंग्याला मोठया प्रमाणात मागणी होत आहे. झायगोग्रामा भुंग्यांचा वापर करुन गाजर गवताचे जैविक पद्धतीने निर्मुलन बाबत डॉ. धुरगुडे यांनी माहिती दिली. कीटकशास्त्र विभागातील कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Wheat Sowing : खानदेशात गव्हाची २४ हजार हेक्टरवर पेरणी शक्य

ZP School : कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळात जिल्हा परिषद शाळेची भरारी

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Krishi Sahayyak : कृषी सहायकांच्या समस्यांवर पुण्यातील बैठकीत चर्चा

SCROLL FOR NEXT