VNMKV, Parbhani : वनामकृवि’ आणि ‘माफसू’त सामंजस्य करार

MAFSU, Nagpur : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) यांच्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
VNMKV, Parbhani
VNMKV, Parbhani Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani News : परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) यांच्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

या कराराचा उद्देश शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, नवीन शैक्षणिक धोरण अवलंबन, कौशल्य विकास, मानव संसाधन विकास आणि उद्योजकतेच्या संधी वाढविण्यासाठी सहकार्य मजबूत करणे हा आहे. या करारावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी स्वाक्षरी केली.

VNMKV, Parbhani
VNMKV Parbhani : ‘वनामकृवि’ आणि वेस्टर्न सिडनी विद्यापीठांत सामंजस्य करार

नागपूर येथे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि भारतीय दुग्ध संघ (पश्‍चिम विभाग) यांच्यातर्फे शनिवारी (ता. १७) व रविवारी (ता. १८) आयोजित ‘दुग्ध व्यवसाय उपजीविका, आरोग्य आणि पोषणासाठी एक साधन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात हा करार करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी होते. या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सहभागी होवून तांत्रिक सत्रामध्ये पॅनेल सदस्य म्हणून योगदान दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com