Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : अनेक शिवारांत रोहित्र दुरुस्तीबाबत चालढकल

Electricity Transformer Issue : वीज वितरण कंपनीतील समस्या सुटल्या का, सर्व आलबेल आहे का, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अनेक गावांत कृषिपंपांचे रोहित्र नादुरूस्त झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : शेतशिवारातील नादुरुस्त रोहित्र दुरुस्ती करण्याबाबत चालढकल आणि दुसरीकडे या रोहित्राच्या माध्यमातून कृषिपंपांसाठी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांना वीजबिलासंबंधी सूचना पाठविल्याचा प्रकार अनेक गावांत घडला आहे. या प्रकारावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकप्रतिनिधी वीज वितरण कंपनीवर नेहमी शेतकऱ्यांसाठी मोर्चे काढायचे, पण आता रोहित्र दुरुस्ती तर होतच नाही, पण वसुलीसाठी सूचना कशा पाठविल्या जातात, असा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता रब्बीची तयारी सुरू आहे. जळगाव, चोपडा, यावल, रावेर भागात वीज कंपनी शेतकऱ्यांना वारंवार रब्बीच्या सुरवातीलाच वेठीस धरते.

यातच शिंगाडे म्यान झाले का, वीज वितरण कंपनीतील समस्या सुटल्या का, सर्व आलबेल आहे का, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. अनेक गावांत कृषिपंपांचे रोहित्र नादुरूस्त झाले आहे. ते यापूर्वीदेखील नादुरूस्त झाले व बंद पडले. त्या वेळेस शेतकऱ्यांनी खासगी कर्मचाऱ्याची मदत घेऊन दुरुस्ती करून घेतली. आता पुन्हा गेल्या तीन दिवसांपासून हे रोहित्र नादुरुस्त आहे.

या रोहित्राची एकदाही वीज वितरण कंपनी किंवा संबंधितांनी दुरुस्ती केली नाही. शेतकऱ्यांना पदरमोड करून रोहित्राची दुरुस्ती करून घ्यावी लागते. सध्या शेतात विविध रब्बी पिके आहेत. रोहित्राची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशातच या रोहित्रावरून विजेचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना वीजबिलासंबंधी भरणा करण्याच्या नोटिसा वीज वितरण कंपनीने बजावल्या आहेत.

यावरून शेतकऱ्यांमध्ये आणखीच संताप वाढला आहे. विजेच्या समस्या तशाच कायम आहेत, त्या वीज वितरण कंपनी सोडवित नाही आणि दुसरीकडे नोटिसा कशा पाठवितात, ज्या विजेचा वापरच झाला नाही, त्या विजेसाठी पैसे कसे भरायचे, वीजबिल माफीची घोषणा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी केली होती, त्या घोषणेचे काय झाले, वसुली कशी करता, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत असून, लोकप्रतनिधींबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. या रोहित्राची तातडीने संबंधितांनी दुरुस्ती करावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना दोन हप्ते एकदम?; मार्च, एप्रिलचा ७३० कोटी निधी मंजूर

Soybean Seed Treatment: कमी पावसाच्या संकटात सोयाबीन लागवडीपूर्वीचे नियोजन कसे करावे?

Papaya Cultivation: पपई लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरवर पोहोचण्याचा अंदाज

Agrowon Podcast: कापसातील तेजी कायम; सोयाबीनमध्ये सुधारणा, कांदा दबावातच तर हळद-हरभरा स्थिर

Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट

SCROLL FOR NEXT