Nashik onion Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Onion : कांदा कोंडी फुटली! नाशकातील सर्व बाजार समित्यांमध्ये आजपासून लिलाव सुरु

Onion Auction : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी १३ दिवसांनंतर अखेर सोमवारी संप मागे घेतला. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेमध्ये कांद्या लिलावाला सुरुवात झाली.

Swapnil Shinde

Nashik Onion News : कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता. १३ दिवसांनंतर सोमवारी व्यापाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला. त्यामुळे आज जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात १३ दिवसांपासून बंद असलेले लिलाव मागे घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार (2 ऑक्टोबर) रोजी कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर मंगळवारी (ता. ३) कांदा लिलाव पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला. पंरतु व्यापाऱ्यांनी एक महिन्याच्या आत अडचणी केंद्र आणि राज्य सरकारने सोडवाव्यात, असा अशी मागणी केली आहे.

कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरू असताना नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून तीन दिवसांपासून कांदा खरेदी सुरू होती. तसेच लासलगावची उपबाजार समिती असलेल्या विंचूर आणि निफाडमधील काही व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दुभफळी पडली होती.

काल सर्वच बाजार समितीच्या संचालक मंडळाने कांदा व्यापाऱ्यांची बैठक घेऊन लिलाव सुरू करण्याची विनंती केली होती. तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

या बैठकीनंतर मंत्री दादा भुसे यांनी संपत काळात बाजार समित्यांनी केलेल्या कारवाया मागे घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला.

बुधवारी सकाळी बाजारपेठेमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे आजपासून सर्वच बाजारपेठेत लिलाव पूर्ववत झाले. सकाळच्या लिलावात कांद्याला किमान ९०० ते कमाल २५४१ रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy : देशात मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यासाठी २६ टक्के अधिकचा खतसाठा; केंद्र सरकारचा लोकसभेत दावा

LPG Gas Price: एलपीजी दरवाढ तत्काळ रद्द करा

Food Preservation Technology: अन्नपदार्थ साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान

Shettale Yojana: शेततळे अनुदान, १७ हजार अर्ज रद्द, कारण काय?

Ammonium Sulphate Fertilizer: अमोनिअम सल्फेटचा फायदेशीर वापर

SCROLL FOR NEXT