Onion Auction : विंचूरपाठोपाठ निफाड बाजार समितीतही लिलाव सुरू ; संचालकांची कांदा व्यापाऱ्यांसोबत बैठक

Onion Trader Strike : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी १३ दिवसांपासून लिलाव बंद केले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांची कोंडी होऊ नये म्हणून विंचूरच्या काही व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले. त्यानंतर आजपासून निफाडमध्ये लिलाव पूर्ववत सुरू झाले.
Onion Auction Nashik
Onion Auction NashikAgrowon
Published on
Updated on

Onion Export Duty : गेल्या 13 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. कांदा निर्यात शुल्क कमी करण्यासह इतर मागण्या मान्य होईपर्यंत लिलाव बंद ठेवणार असल्याची भूमिका कांदा व्यापारी असोसिएशनने घेतली.

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू झाले. त्यानंतर आजपासून निफाड बाजार समितीनेही लिलाव पूर्ववत सुरू केले आहेत. अन्य बाजार समित्याही लिलाव सुरू करण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाकडून उचलली जात आहेत.

Onion Auction Nashik
Onion Traders Strike: नाशिकमध्ये सरकारच्या विरोधात घोषणा; लासलगावमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची बैठक

ऐण सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले. त्यामुळे कांदा उत्पादक रस्त्यावर आले. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाब बंद केले.

व्यापाऱ्यांच्या संपामुळे सर्व बाजार पेठेतील कांद्याचे लिलाव ठप्प झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आहे. तसेच कांदा चाळीत सडत असताना केंद्राने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली आहे.

कांदा निर्यातीवर लागू केलेले 40 टक्के निर्यात शुल्क कमी करावे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी. कांद्याच्या व्यापारावर सरसकट 5 टक्के सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट 50 टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी, आदी मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

दरम्यान, बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी लालसगाव बाजार समितीची उप समिती असलेल्या विंचूरमध्ये काही व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू केले. तसेच आज नाफेड बाजार समितीतही कांदा व्यवहाराला सुरूवात झाली.

लिलाव सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. भावही टिकून असून कमीत कमी १ हजार रुपये, जास्तीत जास्त २ हजार ५११ प्रति क्विंटल दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

दुसरीकडे कांदा व्यापारी असोसिएशनच्या लिलाव बहिष्काराला न जुमानता विंचूर आणि नाफेड बाजार समितीमधील काही व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग नोंदवला. तसेच जिल्ह्यातील इतर बाजार समितीचे संचालक मंडळ व्यापाऱ्यांची चर्चा करून लिलाव पुर्ववत करण्याची विनंती करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com