Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आज (ता. ५) रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे..उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची, तर पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने त्या भागांसाठी सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा, राजस्थानतील अनुपगडपासून दिल्ली, शाहजहानपूर, वस्ती, चापरा ते ईशान्य भारतातील नागालॅण्डपर्यंत विस्तारला होता. ईशान्य राजस्थान आणि परिसरावर, सौराष्ट्र आणि परिसरावर, तसेच दक्षिण कर्नाटकमध्ये ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे..Maharashtra Rain Forecast: मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, विदर्भात पावसाचा अंदाज.मंगळवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यावरील भिरा येथे सर्वाधिक ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..राज्यात पाऊस ओसरला असला तरी कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. आज (ता. ५) रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांच्या खेळात विजांसह हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज कायम आहे..मंगळवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२७.८---२२.६अहिल्यानगर---निरंक---२४.५धुळे---३२.०---२०.८जळगाव---३१.४---२३.४जेऊर---३०.५---२३.५कोल्हापूर---२६.६---२२.६महाबळेश्वर---२०.१---१८.२मालेगाव---३०.२---२२.२नाशिक---२७.२---२२.६.निफाड---२८.७---२२.५सांगली---२८.५---२३.०सातारा---२८.३---२२.३सोलापूर---३२.२---२४.२सांताक्रूझ---३०.८---२६.५डहाणू---३१.८---२५.५रत्नागिरी---३१.६---२५.८छत्रपती संभाजीनगर---३०.०---२२.६धाराशिव---२९.३---२१.०परभणी---३२.०---२३.०.परभणी (कृषी)---३१.५---२२.२अकोला---३१.०---२४.६अमरावती---३०.६---२४.२ब्रह्मपूरी---३३.०---२४.५बुलडाणा---२७.७---२२.२चंद्रपूर---३५.२---२६.४गडचिरोली---३२.०---२५.६गोंदिया---३३.२---२४.२नागपूर---३३.८---२४.४वर्धा---३४.०---२६.०वाशीम---२९.६---२१.२यवतमाळ---३१.२---२२.४.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.८---३२.०पश्चिम महाराष्ट्र---१८.२---३२.२कोकण---२५.५--३१.८मराठवाडा---२१.०---३२.०विदर्भ---२१.२---३५.२.जोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) : रायगड, पुणे घाटमाथा.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा.विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.