Dada Bhuse : समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ः भुसे

Indian Agriculture : समाजाची भावना शेतकऱ्यांप्रती आदरयुक्त होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
Dada Bhuse
Dada Bhuse Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Dada Bhuse News : नाशिक : समाजाने शेतकऱ्यांच्या वेदना जाणल्या पाहिजेत, त्यांच्या कष्टाला न्याय दिला पाहिजे. समाजाची भावना शेतकऱ्यांप्रती आदरयुक्त होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केले.

तळवाडे (ता. मालेगाव) येथील कृषिरत्न फाउंडेशन यांच्या वतीने १०१ गरजू शेतकऱ्यांना बी-बियाणे, साडी चोळी वाटप व ‘कृषिरत्न पुरस्कार’ वितरण करण्यात आले.

या वेळी मंत्री भुसे बोलत होते. अविनाश भारती, कळवण शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश निकम, कृषी उद्योजक संजय हिरे, गोकुळ अहिरे, दीपक जाधव, तळवाडे सरपंच ज्योती पाटील, गोरख कापडणीस, कृषिरत्न फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश पवार आदी उपस्थित होते.  


कृषिरत्न फाउंडेशनच्या वतीने मंत्री दादा भुसे यांना ‘कृषिरत्न महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने तर ‘ॲग्रोवन’चे जिल्हा प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांना ‘कृषिरत्न आदर्श पत्रकार’ पुरस्काराने या वेळी सन्मानित करण्यात आले.

Dada Bhuse
Eknath Shinde : ‘बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे’

पुरस्कारार्थींची नावे
  कृषिरत्न समाजभूषण...भूषण पगार
  कृषिरत्न आदर्श शेतकरी...बाळासाहेब देवरे (वाजगाव, ता. देवळा), चंद्रकांत शेवाळे (टेहरे, ता. मालेगाव), श्रीकांत वाघ (शिरसमणी, ता. कळवण), नितीन ठाकरे (वीरगाव, ता. सटाणा).


  कृषिरत्न आदर्श महिला शेतकरी...सौ. मनीषा इंगळे (साकुरी, ता. मालेगाव).
  कृषिरत्न आदर्श पशुपालक...साहेबराव सोनवणे (तळवाडे, ता. मालेगाव).


  कृषिरत्न आदर्श कृषी उद्योजक...केवळ जाधव (सातमाने, ता. मालेगाव), स्वप्नील आहिरे (वासुळ, ता. देवळा), रवींद्र कहांडळ (सटाणा), जीवन आहेर (कळवण).
  कृषीरत्न आदर्श अधिकारी...दिलीप देवरे (निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com