India Agriulture Update: जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे देशातील खरीप पेरणीला वेग आला असून, पेरणीतील तूट आता तीन टक्क्यांपेक्षाही कमी राहिली आहे. ३१ जुलैपर्यंत खरीप पिकांची ८९४.२२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, गेल्या वर्षीच्या ९२०.७२ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ती २.९ टक्के कमी आहे. केंद्रीय कृषी विभागाच्या साप्ताहिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे..कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पाऊस झाल्याने पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले. त्यामुळे २४ जुलैपर्यंत पाच टक्क्यांवर असलेली तूट आणखी कमी झाली आहे. यंदा आतापर्यंत हंगामाच्या सरासरी क्षेत्राच्या ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे..Kharif Sowing Update: मराठवाड्यात ५.३५ लाख हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीविना.खरिपातील प्रमुख पीक असलेल्या भाताची पेरणी ३०१.४९ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून, ती गेल्या वर्षीच्या ३०८.३९ लाख हेक्टरच्या तुलनेत २.२ टक्के कमी आहे. मात्र सरकारने खरीप २०२६ हंगामासाठी १२.३१५ कोटी टन तांदूळ उत्पादनाचे लक्ष्य ठेवले असून, प्रमुख उत्पादक राज्यांतील पेरणी वाढल्याने उत्पादनात मोठी तूट येण्याची शक्यता नसल्याचे संकेत अहवालात देण्यात आले आहेत..कडधान्यांची पेरणी ९५.१८ लाख हेक्टरवर झाली असून ती ६.३ टक्क्यांनी कमी आहे. यामध्ये तुरीची पेरणी ३४.९१ लाख हेक्टरवर झाली असून, ती ९.२ टक्क्यांनी घटली आहे. मूगाची पेरणीही २९.२२ लाख हेक्टरवर झाली असून, ती ९.३ टक्के कमी आहे. मात्र, उडदाची पेरणी २१.०८ लाख हेक्टरपर्यंत वाढली आहे. .Kharif Sowing 2026 : देशात खरीप पेरणीतील तूट ३ टक्क्यांवर; मागील वर्षीच्या तुलनेत तेलबियांचा पेरा आघाडीवर.याउलट तेलबियांच्या पेरणीत सुधारणा झाली आहे. तेलबियांचे क्षेत्र १७२.३२ लाख हेक्टरवर पोहोचले असून, ते गेल्या वर्षीच्या १७१.१३ लाख हेक्टरपेक्षा ०.७ टक्क्यांनी अधिक आहे. यंदाच्या हंगामात प्रथमच तेलबियांचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या पातळीपेक्षा पुढे गेले आहे. सोयाबीनची पेरणी ११७.६८ लाख हेक्टरवर असून ती किंचित कमी असली, तरी भुईमुगाचे क्षेत्र ४३.०६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे..भरडधान्ये पेरणीत घटकापसाखालील क्षेत्र १०३.५४ लाख हेक्टर असून, ते गेल्या वर्षाच्या तुलनेत २.४ टक्क्यांनी कमी आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि मका या भरडधान्यांच्या पेरणीतही घट नोंदविण्यात आली आहे. ऊस लागवड जवळपास पूर्ण झाली असून, ती ५७.५८ लाख हेक्टरवर आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.