Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : सांगली जिल्ह्यातील गाळप हंगाम मध्यावर

Sugarcane Production : सांगली जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. हंगाम मध्यावर आला असून ४९ लाख ७६ हजार टन उसाचे गाळप करत ५१ लाख ९३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील पंधरा साखर कारखान्यांनी यंदाचा गाळप हंगाम सुरू केला. हंगाम मध्यावर आला असून ४९ लाख ७६ हजार टन उसाचे गाळप करत ५१ लाख ९३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

मार्चअखेर गाळप हंगाम संपेल असे चित्र सध्यातरी आहे. कुंडलचा क्रांती कारखाना गाळपात आणि साखर उत्पादनात तर शिराळ्याचा विश्वासराव नाईक, राजारामबापू पाटील (वाटेगाव) आणि राजारामबापू पाटील (कारंदवाडी) हे कारखाने उताऱ्यात आघाडीवर आहेत.

जिल्ह्यातील गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ झाला. मात्र, जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. त्यामुळे डिसेंबरमध्ये गाळपाची गती मंदावली होती. डिसेंबर संपताच ऊस दराचा तिढा सुटल्याने कारखान्यांची गाळपाची गती वाढली.

डिसेंबरअखेर ३५ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप करत ३५ लाख ४४ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात ४९ लाख ७६ हजार टन गाळप करत ५१ लाख ९३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. पंधरा ते वीस दिवसांत १४ लाख ३ हजार टन उसाचे गाळप झाले असून १६ लाख ४९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.

जिल्ह्यातील कारखान्यांनी केलेले गाळप

कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विंटल) उतारा (टक्के)

श्री दत्त इंडिया ४.३१ लाख ४.५४ लाख ११

राजारामबापू पाटील (साखराळे) ४.७४ लाख ५.२७ लाख ११

विश्वासराव (नाईक) ३.५५ लाख ४.०३ लाख १२

हुतात्मा (वाळवा) २.८२ लाख ३.३३ लाख ११

राजारामबापू पाटील (वाटेगाव) ३.०५ लाख ३.६६ लाख १२

राजारामबापू पाटील (जत) १.४९ लाख १.६२ लाख १०

सोनहिरा (वांगी) ५.५४ लाख ५.३४ लाख ११

क्रांती (कुंडल) ५.७९ लाख ५.५१ लाख ११

राजारामबापू पाटील (सर्वोदय) २.२० लाख २.६२ लाख १२

मोहनराव शिंदे १.७४ लाख १.७७ लाख ११

दालमिया (निनाईदेवी) २.९० लाख ३.४० लाख ११

भारती शुगर (यशवंत शुगर) ६० हजार ६७ हजार १०

केन ॲग्रो १.६२ लाख १.४८ लाख १०

उदगिरी शुगर ३.५१ लाख ३.४४ लाख १०

सदगुरु श्री श्री ३.६२ लाख २.९५ लाख ९

श्रीपती शुगर २.१९ लाख २.३७ लाख ११

एकूण ४९.७६ लाख ५१.९३ लाख १०.४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT