Sugarcane Crushing : उसाचे ५७ लाख टन गाळप

Sugarcane Season : छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी २२ जानेवारीपर्यंत ५७ लाख ११ हजार ४९२ टन उसाचे गाळप केले आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत पाच जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी २२ जानेवारीपर्यंत ५७ लाख ११ हजार ४९२ टन उसाचे गाळप केले आहे. यातून सरासरी ८.६ टक्के साखर उताऱ्याने ४६ लाख ३४७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना हे पाच जिल्हे येतात. या जिल्ह्यांतील २५ कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामासाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी २२ कारखान्यांनी आतापर्यंत प्रत्यक्ष ऊस गाळपात सहभाग नोंदविला. त्यामध्ये १३ सहकारी व नऊ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.

Sugarcane
Sugarcane Crushing : पुणे विभागात एक कोटी २१ लाख टन उसाचे गाळप

नंदुरबार जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ६ लाख २४ हजार १७० टन उसाचे गाळप केले. यातून ७.९३ टक्के साखर उताऱ्याने ४ लाख ९४ हजार ९६९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी अशा दोन कारखान्यांनी एक लाख ६६ हजार १२० टन उसाचे गाळप केले. त्यातून ८.५१ टक्के उताऱ्याने १ लाख ४१ हजार ३४६ क्विंटल साखर उत्पादन केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन सहकारी व तीन खासगी अशा सहा कारखान्यांनी गाळपात भाग घेतला. या कारखान्यांनी ११ लाख ९ हजार ६५३ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ८.९१ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ८९ हजार २२० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील तीन सहकारी व दोन खासगी मिळून पाच कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपात भाग घेऊन १४ लाख १७ हजार ७१७ टन उसाचे गाळप केले. तर ८.६६ टक्के सरासरी साखर उताऱ्याने १२ लाख २८ हजार ३९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

Sugarcane
Sugarcane Production : खोडवा ऊस उत्पादनात अनिकेत बावकर राज्यात पहिले

बीड जिल्ह्यातील पाच सहकारी व दोन खासगी अशा सात कारखान्यांनी २३ लाख ९३ हजार ८३३ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.३१ टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ४९ हजार ५१७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

‘सुरू’ला हेक्टरी ८० टनांपर्यंत उत्पादन

यंदा ‘खोडव्या’ला हेक्‍टरी ६० टनापर्यंत म्हणजे अपेक्षेच्या कमी तर ‘सुरू’ला हेक्टरी ७५ ते ८० टनापर्यंत उत्पादन येत असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

४० टक्के क्षेत्रावरील उसाचे गाळप बाकी

या विभागात २ लाख ५७ हजार हेक्टरवरील ऊस उपलब्ध असेल, असे कारखान्यांनी कळविले होते. साखर व कृषी विभागाच्या कारखान्यांशी संयुक्त घोषणेनुसार साधारणतः २ लाख १ हजार हेक्टरवरील ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध असेल, असे स्पष्ट केले होते. जवळपास ६० टक्के क्षेत्रावरील ऊस तोडल्याचा अंदाज असून आणखी ४० टक्के क्षेत्रावरील उसाचे गाळप बाकी असल्याचा अंदाज आहे. बीड व जालन्यातील काही कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीनंतरही सुरू राहील. मात्र इतर कारखान्यांचा हंगाम २८ फेब्रुवारीपर्यंत संपेल, असा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com