Pench Project Agrowon
ॲग्रो विशेष

AI Security : पेंचमध्ये सुरक्षेसाठी ‘एआय’ची मदत

Virtual Wall : आभासी भिंत म्हणून ओळखल्या (व्हर्च्युअल वॉल) जाणाऱ्या पोर्टलसह वन्यजीव व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे.

Team Agrowon

Nagpur News : मानवी वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षा सुनिश्‍चित करण्यासाठी बफर क्षेत्रात सामान्यतः आभासी भिंत म्हणून ओळखल्या (व्हर्च्युअल वॉल) जाणाऱ्या पोर्टलसह वन्यजीव व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. ही वॉल इंटरनेटयुक्त क्षमतांसह स्मार्ट एआय कॅमेऱ्याची एक साखळी आहे.

‘व्हर्च्युअल वॉल’ वन्यप्राण्यांबरोबर प्रकल्पामधील मानवी हस्तक्षेप, शिकाऱ्यांची अवैध घुसखोरी रोखण्यास सक्षम आहे. या यंत्रणेमुळे विशिष्ट क्षेत्रातील तृणभक्षी प्राण्यांची घनतेबाबत निश्‍चित माहिती मिळणार आहे. प्लॅटफॉर्म डेटाबेसमधून विशिष्ट वाघ शोधण्यास आणि तो शेवटचा कुठे दिसला होता.

त्याच्या आसपास असणाऱ्या इतर वाघांचा मागोवा घेता येईल. मानवी वस्तीजवळ वाघ दिसल्यास वन अधिकाऱ्यांसाठी ई-मेल आणि संदेशाच्या स्वरूपात अलर्ट मिळणार आहे. इंटरनेटचा वेग चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी सिस्टीमची रचना केली आहे. त्यामुळे कमी नेटवर्क भागातही डेटा हस्तांतरित करता येईल. अतिशय कमी वेळात प्रतिमा त्यात टिपता येणार आहे. ही प्रणाली सौर पॅनेलचा वापर करून ऊर्जा निर्मिती करते.

आभासी भिंतीमध्ये नवीन काय?

पेंच प्रकल्प प्रशासनाने हे कॅमेरे विशेष पद्धतीने तयार करून घेतले आहे. ते कॅमेरे फक्त एकाच जागी स्थिर राहणार नाहीत तर हलवता (पोर्टेबल) येणार आहेत. ज्या भागात मानव-प्राणी संघर्षाच्या घटना अधिक आहेत. तेथे त्यांचा वापर करता येईल. यामुळे कॅमेऱ्याची साखळी कायमस्वरूपी ठेवण्याची गरज भासणार नाही.

व्हर्च्युअल वॉल सिस्टीमचा उद्देश वास्तविक-वेळ निरीक्षण प्रणाली तयार करून मानव-वाघ संघर्ष कमी करणे आहे. वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांच्या हालचालीवर सतत नजर ठेवू शकणार आहे. वनाधिकाऱ्यांपर्यंत तातडीने तशी सूचनाही ही यंत्रणा देऊ शकणार आहे. त्यामुळे मानव आणि पाळीव प्राणी यांच्यावरील हल्ल्याचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
डॉ. प्रभू नाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Production: सात लाख कापूसगाठींचे उत्पादन

Local Body Election: ‘झेडपी’, पंचायत समितीसाठी २३३५ अर्ज

Agriculture Innovation: तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर

Rural Womens: ‘महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा’

Tasar Silk: गडचिरोलीत टसर रेशीम कोष बाजारपेठ उभारणीस मान्यता

SCROLL FOR NEXT