Pune News: ‘‘आताची तरुण मुले शेतीकडे वळताना दिसत नाही. शेतीत राबणे हे त्यांना जमत नाही. ग्रामीण भागातील महिलाच शेतीची कामे करतात. एका अर्थाने या महिला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. त्यांना एक भूमिका असते. त्या केवळ दीड हजार रुपये दिले म्हणून मतदान करत नाहीत. त्यांना गृहीत धरणे चुकीचे आहे. त्या आपल्या भूमिकेशी तडजोड करत नाही,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक राजन गवस यांनी केले..आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाच्या निमित्ताने, सोपेकॉम (सोसायटी फॉर प्रमोटिंग पार्टिसिपेटिव्ह इकोसिस्टिम मॅनेजमेंट, पुणे) व ‘मकाम’ने (महिला किसान अधिकार मंच) केलेल्या ‘जखमा फडावरल्या’, ‘जक्खर - ऊसतोड कामगारांचा दुर्लक्षित प्रवास’, ‘भविष्य पेरणाऱ्या शेतकरी महिलांच्या छायाचित्र कथा’, ‘अन्यायातून वाट काढताना’ या पुस्तकांचे प्रकाशन निवारा सभागृह येथे झाले..Rural Women Empowerment : गावकुसात गायब असलेला महिला दिन.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजन गवस बोलत होते. यावेळी ‘पारी’च्या व्यवस्थापकीय संपादक नमिता वाईकर, शेती आणि अर्थविषयक अभ्यासक प्रा. डॉ. अनुपमा उपल, छायाचित्रकार आणि स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक विद्या कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होत्या..Seed Distribution: ग्रामविकास संस्थेतर्फे शेतकरी महिलांना गहू, हरभरा बियाणे वितरण.राजन गवस म्हणाले, ‘‘ऊसतोड कामगारांमधील महिला कामगार ही कारखाना आणि मुकादम यांच्या शोषणाला कायम बळी पडत असते. ती जे जीवन जगते ते स्थलांतरित जगणे असते. राहण्याची जागा, पिण्याचे पाणी तसेच मूलभूत सोयी देखील ऊसतोड कामगारांना मिळत नाही. शेतकरी सुद्धा शोषणाचा बळी आहे. मी स्वतः शेतकरी असल्याने मला याची जाणीव आहे.’’.शेतीमधील अरिष्ट आणि महिलांवरील हिंसाचार यावर बोलताना नमिता वाईकर म्हणाल्या, ‘‘शेतकरी महिला सर्व हक्कांपासून वंचित आहेत. संकटात जगत आहेत. परंतु त्यांच्याविषयी धोरणे बनत नाही. त्यांना दुर्लक्षित केले जाते आहे. त्या जे जगणं जगतात ते खूप धैर्याचे आहे. त्यामुळे शेतकरी महिलांच्या प्रश्नावर काम होणे गरजेचे आहे.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.