AI Technology Farmers : 'शेताच्या बांधापर्यंत ‘ए आय’ तंत्रज्ञान बांधापर्यंत पोहोचवणार'

Sugar Factory : कमी खर्चात जास्त उत्पादन आणि जमीन शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नाला दत्त कारखाना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असे गणपतराव पाटील म्हणाले.
AI Technology Farmers
AI Technology FarmersAgrowon
Published on
Updated on

Chairman of Dutt Sugar Factory : नवीन अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि श्री दत्त कारखाना संलग्न विचाराने काम करण्यावर भर देणार आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन आणि जमीन शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नाला दत्त कारखाना खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी दिली.

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे आयोजित गाळप हंगाम २०२३-२४ ऊस पीक स्पर्धा बक्षीस वितरण व आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री मार्गदर्शन शेतकरी मेळावा झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे मृदाशास्त्र विशेषज्ञ डॉ. विवेक भोईटे म्हणाले, ‘शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून मशागत, रोप लागवड, आंतरमशागत, रोग व कीड नियंत्रण, खत, तण, पाणी आणि खोडवा व्यवस्थापन केल्यास, कमी खर्चात उत्पादन वाढ होण्यास मदत होईल.’

AI Technology Farmers
Sugar Production : सप्‍टेंबरसाठी २३.५ लाख टनांचा साखर विक्री कोटा

तुषार जाधव यांनी उपग्रह तंत्रज्ञान, ए. आय. संवेदके तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, न्यूरो सेन्स किट, पीक नियंत्रण, सुक्रोजचे प्रमाण, शेतात येणाऱ्या अडचणी, हवामान बदल, माती परीक्षण, रोग व किडीचे संभाव्य धोके आदींबाबत माहिती दिली. अध्यक्ष रघुनाथ पाटील, उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक, आप्पासाहेब लठ्ठे, महादेव धनवडे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले.

ऊस पीक स्पर्धेतील विजेते

गाळप हंगाम २०२३-२४ मधील ऊस पीक स्पर्धेतील संजय डफळापुरे, भाऊसो पसारे, चंद्रकांत गाताडे, आताऊल्ला पटेल, अभिजित खोत, संजय पाटील, जंबुकुमार चौगुले, तसेच एकरी १०० टनापेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या अण्णासाहेब मगदूम, वैभव शेरीकर, गणपती नरदे, चैतन्य साजणे, सागर समगे, आदिनाथ लठ्ठे, अशोक चौगुले, सुभाष पाटील, भरत सुतार, जोती गंगधर यांचा सत्कार केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com