Dada Bhuse and Mahendra Thorave Agrowon
ॲग्रो विशेष

Minister and MLA Argument : मंत्री दादा भुसे अन आमदारात वादावादी

Team Agrowon

Mumbai News : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे आणि या गटाचेच आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधीमंडळात जोरदार बाचाबाची झाली.

मुख्य प्रवेशद्वारासमोरील लॉबीत एकमेकाच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांनी दोघांत मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला.

या प्रकाराचे दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. विधानपरिषदेत विरोधकांनी नेमका काय प्रकार घडला आहे, याची विचारणा करत निवेदनाची मागणी केली. यावर सत्ताधाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने विरोधक आक्रमक झाले.

त्यामुळे सभागृहाचे कामकाज एक तास तहकूब करण्यात आले. विधानसभेत आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका करत विधानभवनाच्या आवारात गँगवॉर आले असेल तर ही गंभीर बाब आहे’, असे म्हणत सरकारवर आसूड ओढले.

शुक्रवारी (ता. १) अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले. तत्पूर्वी दुपारी साडेबाराच्या दरम्यान विधीमंडळाच्या पायऱ्यांसमोरील मुख्य लॉबीत भुसे आणि थोरवे यांच्यात वाद झाला. थोरवे यांनी भुसे यांना एक काम सांगितले होते.

त्याबाबत विचारणा करण्यासाठी थोरवे गेले होते. ‘थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणारा होता,’ असे भुसे यांचे म्हणणे होते. त्यानंतर थोरवे यांचाही आवाज वाढला. दोघेही आक्रमक झाले. एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याबरोबरच शिवीगाळही करण्यात आली. दोघांचाही आवाज वाढल्याने गर्दी वाढली. मात्र, शंभुराज देसाई यांनी समजूत काढत त्यांना बाजूला नेले.

याबाबत थोरवे म्हणाले, ‘‘एका कामासंदर्भात दोन महिन्यांपासून मी दादा भुसे यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. ते काम करण्यास मी त्यांना सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगितले होते.

तरीही भुसे यांनी कालच्या बोर्ड मिटिंगला जाणीवपूर्वक ते काम घेतले नाही. मी आज त्यांना हे काम का घेतले नाही असे विचारले. तर ते माझ्याशी उद्धटपणे बोलले. त्यामुळे आमच्यात वादावादी झाली. मात्र, आमच्यातील वाद मिटला आहे.’’

मंत्री भुसे स्पष्टीकरण देताना म्हणाले,‘‘माझ्यात आणि थोरवे यांच्यात वाद झालेला नाही. थोरवे हे सहकारी मित्र आहेत. असे काहीही झाले नसल्याने आपण सीसीटीव्ही पाहू शकता.’’ भुसे आणि थोरवे यांच्यातील वादाचे पडसाद विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले.

विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘‘सभागृहात अशी घटना घडत असेल तर ते गंभीर आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहावेत. सर्व पक्षांचे १५ ते २० आमदार तेथे होते. तेथे फ्री स्टाइल सुरू होती.’’ नाना पटोले यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षा घेतले पाहिजे, असे सांगितले.

भाई जगताप यांनीही याबाबत विचारणा केली. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळ कार्यालयाकडून आलेला खुलासा सादर केला. ‘‘साडेबाराच्या दरम्यान भुसे आणि थोरवे हे लॉबीत चर्चा करत होते. १० क्रमांकामाच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता दोघे मोठ्या आवाजात बोलत होते.

त्यावेळी तेथे शंभूराज देसाई यांनी थोरवे यांना बाजूला नेले. दादा भुसे हे पुढे निघून गेले असे सांगितले. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता विधीमंडळात वायरिंगचे काम सुरू असल्याने तेथील सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही,’’ असे गोऱ्हे यांनी हसत हसत सांगितले.

गँगवॉर विधीमंडळापर्यंत आल्याची शंका

गँगवॉर आता विधीमंडळापर्यंत आले की काय अशी शंका येत असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी विधानसभेत टीका केली. तर कायदा सुव्यवस्था आमदारांमुळे खराब होत असेल तर त्याबाबत खुलासा केला पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT