Agriculture Success: सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रणशूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक सेन्सर्सचा वापर करून तयार केलेल्या तीन उपकरणाच्या आरेखनाला भारत सरकारकडून पेटंट मिळाले आहेत..हवामान बदलाच्या काळात शेती क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य होत आहे. व्यवस्थापनामध्ये अचूकता आणण्याच्या उद्देशाने सेन्सर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर वाढत जाणार आहे. अशा स्थितीमध्ये त्याला पूरक ठरतील, अशा तीन उपकरणांचे आरेखन (डिझाइन) सोलापुरातील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व सहयोगी संशोधन संचालक डॉ. नितीनकुमार रणशूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे..Mahatma Phule Agricultural University: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या यंत्रांना पेटंट.या संशोधन चमूमध्ये डॉ. शशिशेखर खडतरे, डॉ. सुहास उपाध्ये, डॉ. अर्चना पवार, डॉ. अनिल जगधनी, डॉ. संजय तोडमल, डॉ. दत्तात्रेय सोनवणे आणि देशभरातील अन्य कृषी शास्त्रज्ञांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या यशाबद्दल कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी अभिनंदन केले आहे.....अशी आहेत ही तीन उपकरणेएआय आधारित पोर्टेबल मृदा पुनर्जनन उपकरण (AI-Based Portable Soil Regeneration Device): सौर ऊर्जेवर चालणारे हे उपकरण केवळ मातीचे विश्लेषणच करत नाही, तर जमिनीतील पोषक तत्त्वांची कमतरता ओळखून आवश्यकतेनुसार बायोचार आणि सूक्ष्मजिवांचे (Microbes) अचूक डोस इंजेक्शनद्वारे जमिनीत देते. हे उपकरण आयओटी (IoT) सक्षम असून मोबाइलद्वारे ऑपरेट करता येऊ शकते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होणार आहे..Agriculture Technology: संरक्षित शेतीत वायू, आर्द्रता दर्शविणाऱ्या उपकरणाला पेटंट.माती-पाणी आयन विश्लेषण उपकरण (Soil-Water Ion Analysis Device) : माती पाणी तपासणीसाठी सध्या नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवावे लागतात. या वेळेच्या अपव्ययासोबतच खर्चही अधिक होतो. अशा स्थितीत शेतात प्रत्यक्ष जागेवरच (In-situ) माती आणि सिंचनाच्या पाण्याचे परीक्षण करणारे हे उपकरण महत्त्वाचे ठरते. त्याद्वारे सामू (पीएच), क्षारता (ईसी), सोडिअम आणि क्लोराइडचे अचूक प्रमाण अवघ्या काही मिनिटांत कळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांचे आणि पाण्याचे नियोजन तातडीने करणे शक्य होणार आहे..अन्नद्रव्ये कमतरता सूचक पर्ण संवेदक उपकरण (Nutrient Deficiency Leaf Sensor Device) : पिकाच्या पानाला कोणतीही इजा न करता, हे सेन्सर पानाचा पृष्ठभाग स्कॅन करते. त्यातून झाडाला नेमकी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, याचे विश्लेषण करून प्रत्यक्ष वेळेवरील इषारा (रिअल-टाइम अलर्ट) देण्याचे काम हे उपकरण करते. परिणामी, खतांचा अचूक वापर करणे शक्य होते. अनावश्यक खत वापर टळल्यामुळे जमिनीची सुपीकता, पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. अनावश्यक खर्च टाळला जातो..बदलत्या हवामानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याशिवाय पर्याय नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञान सोपे आणि सहजतेने हाताळण्यांयोग्य करण्यासाठी आमच्या शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले आहेत. त्यांनी विकसित केलेले डिझाइन नक्कीच उपयुक्त ठरतील, असा विश्वास वाटतो.डॉ. नितीनकुमार रणशूर, प्रमुख शास्त्रज्ञ, विभागीय संशोधन केंद्र, सोलापूर७८७५३१७६७३.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.