Sugarcane Price agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Price : ऊसदरासाठी ‘आंदोलन अंकुश’चे शिरोळमध्‍ये अन्नत्याग आंदोलन

Andolan Ankush Sanghatana : विविध मागण्यांसाठी ‘आंदोलन अंकुश’ने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane Farmers Protest : गत हंगामातील उसाला २०० रुपये आणि चालू हंगामात प्रतिटन ३ हजार ७०० रुपये जाहीर करावा. यासह विविध मागण्यांसाठी ‘आंदोलन अंकुश’ने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोमवार (ता.०२) अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत तहसीलदार अनिलकुमार हेळकर व शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना परवाडणारा दर जाहीर न करताच साखर कारखाने ऊसतोड करीत आहेत. कार्यक्षेत्रातील शेतकरी कारखान्यांना ऊस द्यायच्या विचारात नाहीत. कारखाने बाहेरून ऊस आणून व पोलीस बळाचा वापर करून कारखाना सुरू ठेवण्‍याचा प्रयत्न करीत आहेत. कारखाने दडपशाही कररीत असल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे.

मागील हंगामात तुटलेल्या उसास २०० रुपये आणि चालू हंगामाला ३७०० रुपये दर जाहीर करावा. सर्व टोळ्या व मशीन लावून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस प्रथम संपवावा व त्यानंतर गेटकेन किंवा बाहेरील ऊस आणावा. क्रमपाळीनुसार कार्यक्षेत्रातील ऊसतोड कार्यक्रम तयार करावा. त्यानुसार ८० टक्के लावण व २० टक्के खोडवा तोड करण्यासाठी कारखान्यांनी कार्यक्रम तयार करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT