AgriTech Report Agrowon
ॲग्रो विशेष

AgriTech Report : अ‍ॅग्रीटेक क्षेत्रात २०२५ मध्ये गुंतवणूक वाढण्याची शक्यता; 'थिंकअ‍ॅग'च्या अहवालाचे संकेत

Agriculture Technology : २०२४ पासून कृषी क्षेत्रातील गुंतवणूकदारांमुळे नवचेतना मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह टिकून असल्याचा दावा 'अ‍ॅगफुडटेक इन इंडिया २०२५' च्या अहवालात करण्यात आला आहे.

Dhananjay Sanap

Agricultre AI : अ‍ॅग्रीटेक गुंतवणूकदारांना नवीन तंत्रज्ञानाने भुरळ घातली आहे. त्यामुळे २०२५ मध्ये अ‍ॅग्रीटेक क्षेत्रातील गुंतवणूक आणखी वाढण्याची संकेत 'थिंकअ‍ॅग' या संस्थेच्या अहवालात देण्यात आले आहेत. २०२४ पासून कृषी क्षेत्रातील गुंतवणूकदारांमुळे नवचेतना मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह टिकून असल्याचा दावा 'अ‍ॅगफुडटेक इन इंडिया २०२५' च्या अहवालात करण्यात आला आहे. 

अ‍ॅग्रीटेक क्षेत्राने २०१८ ते २०२२ मध्ये चांगली गती घेतली. कृषी तंत्रज्ञानातील विविध स्टार्टअप्सना मोठ्या गुंतवणूकदारांचा आधार मिळाला. परंतु २०२३ मध्ये जागतिक आर्थिक अस्थिरता, महागाईमुळे स्टार्टअप्समधील गुंतवणुकीला ब्रेक लागला होता. 

अ‍ॅग्रीटेकमधील गुंतवणूक २०२३ मध्ये ९०१ दशलक्ष अमेरिकन डॉलरवरून ३२० दशलक्ष अमेरिकन डॉलरवर घसरली. म्हणजेच २००२ च्या तुलनेत तब्बल ६५ टक्क्यांनी घरसली. त्यामुळे अ‍ॅग्रीटेक क्षेत्राला मोठा फटका बसला. परंतु २०२४ मध्ये अ‍ॅग्रीटेक गुंतवणूक ४११.७४ दशलक्ष अमेरिकन डॉलरवर पोहचली. त्यामुळे अ‍ॅग्रीटेक क्षेत्राला नवचेतना प्राप्त झाल्याचं थिंकअ‍ॅगच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

२०२४  मध्ये अ‍ॅग्रीटेकमध्ये झालेल्या व्यवहारांची संख्या कमी होऊन ६१ इतकी झाली होती. तरीही गुंतवणूकदारांनी नव्या कंपन्यांपेक्षा जुन्या गुंतवणुकीकडे अधिक लक्ष दिलं. ८२ टक्के व्यवहार जुन्या कंपन्यांना पुढच्या टप्प्याचे पैसे देण्यासाठीच झाले. तर केवळ १५ टक्के कंपन्यांनाच १५ दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त रक्कम मिळाल्याचं थिंकअ‍ॅगने अहवालात स्पष्ट केलं आहे. 

२०२४ मध्ये अ‍ॅग्रीटेक क्षेत्रात उत्पादनानंतरच्या टप्प्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत झाली. तसेच अचूक माहितीच्या आधारे शेती करण्याच्या तंत्रज्ञानानेही गुंतवणूकदारांचं लक्ष वेधलं आहे. तर फूडटेक क्षेत्रातील गुंतवणुकीतही १८ टक्के वाढ झाल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. 

२०२४ मध्ये गुंतवणूकदारांनी ज्या प्रकारे सावधगिरीने पावलं उचलली. २०२५ मध्येही गुंतवणूकदार सावधगिरी बाळगतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीही गुंतवणूक विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीनेच होईल, असे संकेतही थिंकअ‍ॅगच्या अहवालात देण्यात आली आहेत.

२०२५ मध्ये थोडी अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे. काही मोठ्या शेवटच्या टप्प्यातील व्यवहारामुळे यावर्षी एकूण गुंतवणूक ५०० ते ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या दरम्यान असू शकते. २०२४ मध्ये गुंतवणूकदार पुन्हा अ‍ॅग्रीटेककडे वळाले आहेत. गुंतवणूकदारांमध्ये पूर्वीप्रमाणे केवळ वाढ यावर भर न देता, आता नफा कमवण्याचा मार्ग आणि शेअर बाजारात जाण्याची तयारी अधिक महत्त्वाची झाली आहे.
हेमेंद्र माथूर,  सह-संस्थापक थिंकअ‍ॅग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT