AI In Agriculture : ब्रिक्स परिषदेत कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर भर; भारतात पुढच्या वर्षी 'एआय समिट'

AI Impact Summit : ब्राझीलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स २०२५ परिषदेत ब्रिक्स देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि शेती क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला. या परिषदेत भारतात एआयच्या प्रभावावर चर्चा करण्यासाठी 'एआय इम्पॅक्ट समिट' आयोजित करण्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.
BRICS 2025 PM Modi
BRICS 2025Agrowon
Published on
Updated on

BRICS 2025 Brasil : ब्राझीलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स २०२५ परिषदेत ब्रिक्स देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि शेती क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत भारतात एआयच्या प्रभावावर चर्चा करण्यासाठी 'एआय इम्पॅक्ट समिट' आयोजित करण्याचे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले आहेत.  

पंतप्रधान मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत २१ वं शतक एआयचं असल्याचं प्रतिपादन केलं. "२१व्या शतकात लोकांच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन एआय ठरणार आहे. भारत एआयला मानवी मूल्ये आणि क्षमता वाढवण्याचे माध्यम मानतो. ब्रिक्स कृषी संशोधन मंचाच्या माध्यमातून भारतात कृषी संशोधनात सहकार्य, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी उपाय शोधले जात आहेत. त्याचा फायदा जागतिक दक्षिणेतील देशांनाही मिळू शकतो." असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

भारतात कृषी, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये एआयचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, "आजच्या बैठकीत प्रसिद्ध होणारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक प्रशासनावरील नेत्यांचे विधान या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. सर्व देशांमधील सुधारित सहकार्यासाठी आम्ही पुढील वर्षी भारतात 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव शिखर परिषद' आयोजित करणार आहोत. या शिखर परिषदेला यशस्वी करण्यासाठी तुमच्या सक्रिय सहभागाची आम्हाला आशा आहे." असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं.  

BRICS 2025 PM Modi
AI in Education: ‘रयत’मध्ये पाचवीपासून पदवीपर्यंत‘एआय’चे शिक्षण : शरद पवार

ब्रिक्स कृषी संशोधन मंच

ब्रिक्स कृषी संशोधन मंच ब्रिक्स देशांमध्ये कृषी संशोधनातील सहकार्य वाढवण्यासाठी तयार केलेला एक संयुक्त उपक्रम आहे. हा उपक्रम भारताच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ब्रिक्स देशांमधील शेती क्षेत्रातील ज्ञान, संशोधन आणि नवकल्पना यांची देवाणघेवाण करण्यात येते.

ब्राझील आणि चीनचा एआय करार

अन्नधान्य उत्पादन वाढवण्यासाठी एआय वापराच्या दिशेने एकत्र काम करण्यावर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासिओ लुला दा सिल्वा आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर रिओ दि जानेरो येथे दोघांनी घोषणा केली. हवामान बदलाशी अनुकूल शेती पद्धती आणि कोरडवाहू शेती सुधारण्यासाठी एकत्र काम करण्यात येणार आहे.

BRICS 2025 PM Modi
AI in Education: ‘रयत’मध्ये पाचवीपासून पदवीपर्यंत‘एआय’चे शिक्षण : शरद पवार

त्यासाठी ब्राझीलच्या कोरडवाहू भागात ब्राझीलचे 'नेशनल सेमी अॅरिड इन्स्टिट्यूट' आणि 'चायना अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी' एकत्र काम करणार आहेत. या केंद्राचा पहिला प्रकल्प सिमांत शेतकऱ्यांसाठी एआय लॅब तयार करण्याचा आहे. यामध्ये शेतातील मशिनरीत तांत्रिक सुधारणा करून मातीची गुणवत्ता व पर्यावरणावर लक्ष देण्यात येणार आहे, असे इन्साचे संचालक जोसे एथम बार्बोसा यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com