
Jalgaon News : जळगाव ः जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री भवरलालजी जैन (मोठेभाऊ) यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जैन उद्योग समूहातर्फे करण्यात आले आहे. यात ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ या कृषी महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले.
या वेळी माजी फलोत्पादन आयुक्त तथा पुसा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एच. पी. सिंग, जैन इरिगेशन सिस्टीम्स ली.चे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, गिमी फरहाद, डॉ. सुधीर भोंगळे, अंकुश गोरे यांच्यासह शेतकरी, कंपनीचे सहकारी उपस्थित होते. हा कृषी महोत्सव पुढे १४ जानेवारी २०२४ पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे.
कृषी महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी आहे. केळीच्या इल्लाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या केळी वाणांच्या बागा शेतकऱ्यांना पाहण्यासाठी किंवा अभ्यासण्यासाठी उपलब्ध आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजूने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रूट केअर, ३० फूट उंच केळी बाग आदी तंत्रज्ञान त्यात आहे.
उसाची आधुनिक पद्धतीने केलेली लागवड, विविध वाण, फ्लॅटबेड, राइसबेड आणि मल्चिंगचा उपयोग केलेल्या कापूस लागवड पद्धतीचा प्रयोग, आठ वेगवेगळ्या वाणांचे लसूण पीक, कांदा लागवड, अल्ट्राहायडेन्सिटीच्या फळबागा, पपई, केळी, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज, रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आल्याचे आंतरपीक, ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन, शेतीत वापरली जाणारी यंत्रसामग्री, विविध अवजारे आदींचे आकर्षण या महोत्सवात असणार आहे.
करारशेतीअंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पीक शेती पाहण्यासाठी उपलब्ध आहे. जैन हिल्स येथे नोंदणी करून या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. या महोत्सवास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.