Jalgaon News: खरिपात खानदेशात कापूस प्रमुख पीक असून, जुलै व ऑगस्टमधील पावसाचा ताण आणि नंतर अतिपावसाने पिकाची वाताहत झाली. आता दर कमी आहेत. रोगराईमुळे उत्पादनात घट येणार असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. .कापूस दर दर्जा, ओलावा आदी कारणे सांगून ५०००, ५५००, ६००० ते ६५०० रुपये, असे खेडा खरेदीत दिले जात आहेत. चार ते पाच प्रकारचे दर कापसाला आहेत. हमीभाव मिळत नाही. दुसरीकडे मजुरी दर वाढले. उत्पादन खर्चही अधिक आहे..Cotton Rate: धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला ७११० रुपयांचा दर.कापसाची सर्वाधिक लागवड खानदेशात केली जाते. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कापूस लागवडीत खानदेश आघाडीवर आहे. यात पूर्वहंगामी कापसाचीदेखील दोन लाख हेक्टरमध्ये खानदेशात लागवड झाली आहे. ही लागवड मे अखेरीस व जूनच्या सुरुवातीला झाली. तर एकूण कापूस पीक खानदेशात सुमारे साडेसात लाख हेक्टरवर आहे. यंदा लागवड सुमारे ७० ते ८० हजार हेक्टरने कमी झाली..पण अन्य पिकांच्या तुलनेत कापूस लागवड अधिकच आहे. खरिपातील एकूण लागवड खानदेशात सुमारे १४ लाख हेक्टरवर झाली आहे. यंदा पाऊस वेळेत आल्याने पेरा ९४ टक्के झाला होता. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार लाख ७५ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात पाच लाख ११ हजार हेक्टरवर कापूस पीक होते..CCI Cotton Procurement : सीसीआयच्या कापूस खरेदी नोंदणीची मुदत वाढवा .कापूस लागवडीत मागील हंगामाच्या तुलनेत घट झाली आहे. पूर्वहंगामी पिकात बोंडे उमलण्यास सुरुवात झाली. ऊनही मध्यंतरी तापले. आता दर्जेदार शेतमाल हाती येत आहे. पण दर कमी आहेत. त्यात यंदा २४ जुलै ते १६ ऑगस्ट या कालावधीत पावसाचा खंड होता. यात पिकाचे नुकसान झाले. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये काही भागात अति पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, बोदवड, पारोळा या प्रमुख कापूस उत्पादक तालुक्यांत नुकसान अधिक झाले..पावसात हानी मोठीखानदेशात अतिपावसाने सुमारे २५ ते ३० हजार हेक्टरवरील कापसाची हानी झाली आहे. पंचनामे सुरूच आहेत. अनेक भागांत कापूस पीक लाल -पिवळे झाले आहे. त्याची वाढ थांबली आहे. कोरडवाहू कापूस पिकात फूल-पाते गळ सुरू आहे..काळ्या कसदार जमिनीत समस्या अधिककाळी कसदार जमीन पाण्याचा निचरा फारसा करीत नाही. यात सतत पाऊस असल्याने या जमिनींत वाफसा नाहीसाच झाला. पुन्हा वाफसा अनेक भागात दिसला नाही. मध्यंतरी निरभ्र वातावरण होते. आता पुन्हा ढगाळ वातावरण आहे. यामुळे पिकात रोगराई दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.