Kolhapur News: कोल्हापूर येथील बाजार समितीत पाडव्याच्या मुहूर्ताच्या सौद्यात गुळास ४ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. मधुकर पाटील यांच्या अडत दुकानात हे सौदे निघाले. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व सभापती सूर्यकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सौदे निघाले. .कोल्हापुरी गूळ हा विशिष्ट भौगोलिक वातावरणात तयार होणार गूळ म्हणून लौकिक प्राप्त आहे. या गुळाला देश भरातून मागणी असते. या गुळाचे सौदे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू होतात..Kolhapur Jaggery Price: कोल्हापुरात दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे, मिळाला 'इतका' भाव.त्यानुसार या सौद्यांमध्ये जवळपास ५ हजार गूळ रव्यांचे सौदे तासभरात झाले. गुळाला मिळालेल्या भावावर मुश्रीफ म्हणाले, की कोल्हापुरी गुळाचा लौकिक आहे तो असाच वाढत राहावा यासाठी गूळ उत्पादनही वाढावे त्याला दरही चांगला मिळावा यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे..Jaggery Price: गुजरातमधून नवरात्रीसाठी गुळाच्या खरेदीत वाढ.सभापती पाटील म्हणाले, की चांगल्या प्रतीचा गूळ उत्पादकांनी बनवावा गेल्या काही वर्षात साखर मिश्रीत गूळ येत आहे. यामुळे भाव देण्यास व्यापाऱ्यांकडून अडचणी येतात. गेल्या काही वर्षांत गुऱ्हाळ घरांची सख्या घटली आहे..तर मागील काही वर्षांत गुळाचे उत्पादन घटले आहे. पूर्वी ३५ लाख रवे बाजारात येत होते याची संख्येत घट होऊन ती २५ लाखांवर आली आहे. तर ११० गुऱ्हाळ घरे शिल्लक आहेत. यंदा ४० लाख गूळ रव्यांचे उत्पादन व्हावे यासाठी बाजार समिती प्रयत्नशील आहे. या वेळी बाजार समिती संचालक मंडळ, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, अडते, व्यापारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.