Agriculture Minister Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Diploma Jobs: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत न्याय देणार; कृषिमंत्री कोकाटे

Krushi Bharti Maharashtra: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत प्राधान्य मिळत नसेल तर त्यासंबंधी पदविकाधारक विद्यार्थ्यांसमवेत चर्चा केली जाईल. येत्या काळात होणाऱ्या नोकर भरतीत त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल.

Team Agrowon

Pune News: कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत प्राधान्य मिळत नसेल तर त्यासंबंधी पदविकाधारक विद्यार्थ्यांसमवेत चर्चा केली जाईल. येत्या काळात होणाऱ्या नोकर भरतीत त्यांना योग्य तो न्याय दिला जाईल. जेणेकरून त्यांना अडचणी येणार नाहीत, अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

‘ॲग्रोवन’मध्ये ‘कृषी पदविकाधारकांना नोकर भरतीत प्राधान्य द्या’ या विषयाचे वृत्त सोमवारी (ता. १४) प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल मंत्री श्री. कोकाटे यांनी घेतली असून ॲग्रोवनच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. त्या वेळी श्री. कोकाटे म्हणाले, ‘‘ मला या संदर्भात माहिती मिळाली आहे.

परंतु त्यासंबंधीचे निवेदन मला मिळालेले नाही. ते मिळेल्यानंतर सर्व बाबी तपासल्या जातील. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा होत आहे. गेल्या आठवड्यात कृषी विभाग, शिक्षण विभागासंबधी रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा झाली आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. ’’

कृषी आयुक्त सूरज मांढरे म्हणाले, ‘‘कृषी पदविकाधारकांच्या प्रश्नासंबंधी माझ्या कार्यालयात विद्यार्थ्यांनी निवेदन दिलेले असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. त्यानंतर पदविकाधारकांच्या मागण्या विचारात घेऊन मंत्र्यांच्या बैठकीवेळी त्या निदर्शनास आणून देऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले, ‘‘ विद्यापीठात सध्या अनेक पदे रिक्त आहेत. यापूर्वी नोकर भरतीत आम्ही कृषी पदविकाधारकांना सामावून घेतले आहे. परंतु रिक्त जागांसंबंधीची चर्चा अधिवेशनात कृषिमंत्र्यांनी केली आहे. कृषी पदविकाधारकांचे निवेदन माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही. परंतु ते आल्यास योग्य तो न्याय दिला जाईल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Flood : शेतकऱ्यांनो, खचू नका; सरकार तुमच्या पाठीशी

Nanded Flood : संसार उघड्यावर, जगायचे कसे?

Rain Damage Compensation : खरडून गेलेल्या जमिनीचे अचूक पंचनामे करा

Sugarcane Rate : मांजरा साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी दर

Landslide : पावसाचा जोर वाढला; करूळ घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT