Agriculture Commissioner : कृषी आयुक्तपदाची सूत्रे सूरज मांढरे यांनी स्वीकारली

Agriculture Commissioner Suraj Mandhre : राज्याच्या कृषी आयुक्तपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदाची सूत्रे बुधवारी (ता. १) स्वीकारली. कृषी विभागात स्वच्छ व गतिमान कामकाजाला प्राधान्य दिले जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
Agriculture Commissioner Suraj Mandhre
Agriculture Commissioner Suraj MandhreAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या कृषी आयुक्तपदी सूरज मांढरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदाची सूत्रे बुधवारी (ता. १) स्वीकारली. कृषी विभागात स्वच्छ व गतिमान कामकाजाला प्राधान्य दिले जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी मंगळवारी (ता. ३१) रात्री मांढरे यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. ‘कृषी आयुक्तपदाची श्रेणी अवनत करून आपली निवड केली जात आहे. आपण नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा.

Agriculture Commissioner Suraj Mandhre
Agricultural Commissioner : भागडे बनले चौथ्यांदा प्रभारी कृषी आयुक्त

तसेच क्रीडा व युवक सेवा आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील धारण करावा,’ असे श्रीमती राधा यांच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. यापूर्वीचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांची बदली नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रकपदी करण्यात आली आहे. या पदासाठी सनदी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते. आयुक्तपदाच्या कालावधीत श्री. बिनवडे यांनी कोणताही वादग्रस्त निर्णय घेतला नाही.

Agriculture Commissioner Suraj Mandhre
Agriculture Commissioner : कृषी आयुक्त विदेशातून परतले

श्री. मांढरे यांनी श्री. बिनवडे यांच्याकडून बुधवारी (ता. १) कृषी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, कृषी संचालक डॉ. कैलास मोते (फलोत्पादन), सुनील बोरकर (गुणनियंत्रण), विनयकुमार आवटे (विस्तार), अशोक किरन्नळी (आत्मा), रफिक नाईकवाडी (विस्तार), किसन मुळे (फलोत्पादन मंडळ) आस्थापना विभागाची सहसंचालक गणेश घोरपडे, कृषी आयुक्त कक्षाचे उपसंचालक कांतिलाल पवार व इतर उपस्थित होते.

संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित

सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात मितभाषी, पारदर्शक काम करणारे आणि संवेदनशील म्हणून सूरज मांढरे ओळखले जातात. कोरोना काळात नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जिल्हा उत्तमपणे हाताळलाच; पण कोरोनामुळे अनाथ झालेल्या एका मुलाचे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. ते पाहून अनेक सरकारी अधिकाऱ्यांनीही श्री. मांढरे यांचे अनुकरण केले होते,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com