Dairy Diploma : दुग्ध उत्पादन पदविकेकरिता दहावी उत्तीर्णच असणार पात्रता

Dairy Production : पशुचिकित्सा पदविका अभ्यासक्रम दहावी की बारावीनंतर यावर दोन संघटनांतील वादांमुळे गेल्या दोन वर्षांपासून तोडगा निघू शकला नाही.
MAFSU
MAFSU Agrowon
Published on
Updated on

Nagpur News : पशुचिकित्सा पदविका अभ्यासक्रम दहावी की बारावीनंतर यावर दोन संघटनांतील वादांमुळे गेल्या दोन वर्षांपासून तोडगा निघू शकला नाही. परिणामी, ‘माफसू’ने यंदा दहावीच्या पात्रतेवरच पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमाला प्रवेश दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नव्या प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावीनंतरची पात्रता अपेक्षित धरली जाणार नाही. त्यामुळेच बारावीनंतर तीन वर्षे कालावधीचा पदविका अभ्यासक्रम असावा, अशी मागणी आहे. मात्र नव्या शैक्षणिक धोरणात तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम हा पदवी, एक वर्षाचा प्रमाणपत्र, तर दोन वर्षांचा पदविका असे ग्राह्य धरले जाणार आहे.

सद्यःस्थितीत देशात गुजरातचा अपवाद वगळता इतरत्र कोठेही तीन वर्षांचा अभ्यासक्रम नाही. त्यामुळेच बारावीनंतर तीन वर्षांचा अभ्यासक्रम असावा व त्यात पशुचिकित्साशास्त्र देखील समावेशीत करावे, अशी मागणी पदविकाधारकांची आहे. याला पदवी अभ्यासक्रमधाकरांनी तीव्र विरोध चालविला आहे. त्याच कारणामुळे गेल्या दोन वर्षांपासून तीन वर्षे कालावधीसाठीचा पदविका अभ्यासक्रम तयार असतानाही त्याला मंजुरी मिळत नसल्याची स्थिती आहे.

MAFSU
MAFSU : म्हशीच्या श्‍वसननलिकेपासून कॉन्ड्रॉयटिन सल्फेट

आता लवकरच पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू होणार आहेत. त्याकरिता माफसूकडून नोटिफिकेशन काढले जाईल. जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ते निघेल. त्यांनतर प्रवेश सुरू होतील, मात्र दोन वर्षे की तीन वर्षे या बाबतचा विद्यार्थ्यांचा संभ्रम कायम आहे.

MAFSU
MAFSU : ‘माफसू’चे संशोधित तंत्रज्ञान प्रसारात सांघिक प्रयत्नांची गरज

परिणामी, या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. पदवी आणि पदविकाधारकांनी या संदर्भात टोकाची विरोधी भूमिका घेतली आहे. त्याच्याच परिणामी या विषयातील निर्णय रखडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रातील पॅरामेडिकल स्टाफसाठी ६७ प्रकारचे पदवी, पदविका, पदव्यूत्तर अभ्यासक्रम आहेत. त्याच धर्तीवर पशुचिकित्साशास्त्र क्षेत्रात बारावीनंतर पशुचिकित्साशास्त्र पदविका अभ्यासक्रमाची मागणी गेल्या ४० वर्षांची आहे. ती चार वेळा मंजूर झाली आणि तत्कालीन पशुसंवर्धन आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांच्या काळात अंमलबजावणीचा निर्णयही झाला. मात्र याला विरोध करून खोडा टाकण्याचे काम होत आहे. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाला यंदापासून मान्यता मिळावी.
- डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय महासचिव, भारतीय पशू चिकित्सा सेवा महासंघ
राज्यात डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या ११० शाळा आहेत. एका शाळेची सरासरी प्रवेश क्षमता ६० असून, दरवर्षी ६२५० विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्या वर्षी ५७०० विद्यार्थी प्रवेशित होते. गेल्या दोन वर्षांपासून डिप्लोमा अभ्यासक्रम दहावीनंतर की बारावीनंतर यावर वाद सुरू आहे. विद्यापीठाने तीन वर्षांकरिता अभ्यासक्रमा तयार केला आहे. एक आणि दोन वर्षांचा अभ्यासक्रमाला मान्यता मिळाल्यास त्याकरिता देखील विद्यापीठ प्रशासन तयार आहे. यंदा मात्र दहावीच्या पात्रतेवर पूर्वीच्याच दोन वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश होतील.
- डॉ. अनिल भिकाने, अधिष्ठाता (निम्न शिक्षण), महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com