Diploma in Co-op. Management : राज्यातील पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी ‘मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम

YCMOU : संयुक्त राष्ट्रसंघाने २०२५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, नुकतीच यासंदर्भात मुक्त विद्यापीठात विशेष बैठक घेण्यात आली.
YCMOU
YCMOUAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ‘डिप्लोमा इन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मॅनेजमेंट’ हा विशेष पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित केल्याच्या पार्श्‍वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून, नुकतीच यासंदर्भात मुक्त विद्यापीठात विशेष बैठक घेण्यात आली. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

डॉ. सोनवणे म्हणाले, की महाराष्ट्रातील सहकार चळवळीला समृद्ध इतिहास आहे. शेती, रोजगार आणि उद्योगधंद्यांना सहकार क्षेत्राने भक्कम पाठबळ दिले आहे. पतसंस्थांच्या प्रशासनात गती, सुसूत्रता आणि अद्ययावतता येण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल.

YCMOU
Cooperative Society Election : लासलगाव खरेदी-विक्री संघावर ‘प्रगती’ पॅनेलची सत्ता

ओमप्रकाश कोयटे यांनी विश्वास व्यक्त केला, की, ‘शिक्षित कर्मचाऱ्यांमुळे कामकाजात शिस्त आणि व्यावसायिकता येईल. त्यामुळे सहकार चळवळीला अधिक गती मिळेल. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे संचालक प्रा. सुरेंद्र पाटोळे यांनी सांगितले, की राज्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

YCMOU
Cooperative Society Recruitment : सेवा सहकारी संस्थांच्या सचिव पदभरतीस मनाई

सहकार खात्याशी समन्वय साधून यासंदर्भात आवश्यक परिपत्रकही लवकरच काढण्यात येणार आहे. फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी सांगितले, की या अभ्यासक्रमामुळे पतसंस्था चळवळ अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध बनेल. अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रा. पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली असून, माजी सहकार आयुक्त शैलेश कोथमिरे, प्रा. डी. एम. गुजराती यांच्यासह इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी डिप्लोमा आवश्यक

फेडरेशनच्या संचालिका अॅड. अंजली पाटील म्हणाल्या, की सध्या अनेक कर्मचारी कोणतेही औपचारिक बँकिंग प्रशिक्षण न घेता पतसंस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमाची गरज होती. बारावी उत्तीर्ण अधिकारी-कर्मचारी पात्र असतील. यापुढे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय पतसंस्थेमध्ये कोणतीही नियुक्ती किंवा पदोन्नती देणे शक्य होणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com