Sharad Gadakh: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना प्रतिष्ठित ‘ऑनर्ड फेलो ॲवॉर्ड’

Honored Fellow Award: डॉ. पंजाबराव देशमुख व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना नवी दिल्ली येथे CHAI कडून २०२५ चा ‘ऑनर्ड फेलो अॅवॉर्ड’ मिळाला.
Sharad Gadakh
Sharad GadakhAgrowon
Published on
Updated on

Akola News: येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व तसेच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना नवी दिल्ली येथील कॉन्फिडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI) यांच्या वतीने २०२५ मधील प्रतिष्ठेचा ‘ऑनर्ड फेलो अॅवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

उद्यानिकी क्षेत्रातील शिक्षण, संशोधन, विस्तार व विकास कार्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेत हा राष्ट्रीय सन्मान देण्यात आला.हा पुरस्कार बिहार राज्यातील साबौर येथे अलीकडेच पार पडलेल्या राष्ट्रीय फलोत्पादन परिसंवादात देशभरातील नामवंत शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

Sharad Gadakh
Agriculture Colleges : रिक्त पदांमुळेच कृषी विद्यापीठांची दुरवस्था

या कालावधीत परभणी येथे महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांची संयुक्त संशोधन व विकास समितीची ५३ वी बैठक असल्यामुळे डॉ. गडाख हे उपस्थित राहू शकले नव्हते. नागपूर येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश कडू यांनी पुरस्कार स्वीकारला होता.

विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण

या सन्मानानंतर कुलगुरू कार्यालयात डॉ. गडाख यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता (उद्यानविद्या) डॉ. अरविंद सोनकांबळे, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे, डॉ. ज्ञानेश्वर माळी, अभियंता अमित राठोड उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com