Agriculture Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला (मराठवाडा विभाग)

Team Agrowon

Agriculture Advice :

कापूस

अवस्था : वाढीची.

कापूस पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून घ्यावीत. पीक जास्तीत जास्त तण विरहीत ठेवावे.

कोवळ्या पानांवर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क (५%) किंवा ॲझाडिरॅक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मिलि प्रति लिटर प्रमाणे पहिली फवारणी करून घ्यावी. पुढे गरज भासल्यास ॲसिटामिप्रिड (२० %) ०.२ ग्रॅम प्रति लिटर किंवा फ्लोनिकॅमिड (५०%) ६० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे फवारणी करावी.

लागवडीला एक महिना झालेल्या कोरडवाहू कपाशी पिकास हेक्टरी ३६ किलो नत्र तर बागायती कापूस पिकास हेक्टरी ६० किलो नत्राची मात्रा द्यावी.

कापूस पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

तूर

अवस्था : वाढीची.

तूर पीक पिवळे दिसून येत असल्यास त्यातील अन्नद्रव्याची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असू शकते. त्यांच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट (ग्रेड-२) ५० ग्रॅम किंवा ५० मिलि अधिक १९:१९:१९ खत १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

तूर पिकात जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पीक तण विरहीत ठेवावे.

मूग, उडीद, भुईमूग, मका

अवस्था - वाढीची.

पावसाळी वातावरणाच पिकात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

जमिनीत वाफसा असताना आंतरमशागतीची कामे करून पिके तण विरहीत ठेवावीक.

मका

अवस्था : वाढीची

मक्यामध्ये अनेक ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी, इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. फवारणी करताना द्रावण पोंग्यात पडेल अशाप्रकारे करावी.

फळबागा ( केळ, आंबा, सिताफळ)

बागेत पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

डॉ. के. के. डाखोरे, ०९४०९५४८२०२

(मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT