Maize Army Worm : मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

Maize Pest : मक्याला बाजारात असलेली मागणी व चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती आहे. गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे.
Maize Army Worm
Maize Army WormAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मक्याला बाजारात असलेली मागणी व चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांची मका लागवडीला पसंती आहे. गेल्या काही वर्षांत हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्रात वाढत आहे. मात्र लष्करी अळीने मका उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढतच आहे. त्यात उत्पादनावरही परिणाम होत असतो. यंदाही लष्करी अळी प्रादुर्भावाने जिल्ह्यातील ८ तालुक्यात डोके वर काढल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

शेतकरी गेल्या दशकात टप्प्याटप्प्याने मका लागवडीकडे हळूहळू कळलेला आहे. जिल्ह्यात चालूवर्षी २ लाख १७ हजार १०८ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड प्रस्तावित होती. त्यापैकी २ लाख १२ हजार ५१५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. पेरा सरासरीच्या तुलनेत ९७ टक्के आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव उत्पादनाच्या अंगाने अडचणीचा ठरत आहेत. २०१९ मध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव पेरणीच्या ९० टक्के क्षेत्रावर होता.

Maize Army Worm
Maize Army Worm Pest : वेळीच परतवा ‘लष्करी’ हल्ला

त्या वेळी प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजना करूनही प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. यावर रासायनिक व जैविक फवारण्या करून प्रादुर्भाव नियंत्रणात आणला होता. गेल्या दोन वर्षांत हा प्रादुर्भाव कमी दिसून आला. तर २०२४ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी हा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी समस्येच्या गर्तेत सापडण्याची शक्यता आहे. नुकसान टाळण्यासाठी सध्या फवारण्या केल्या जात आहेत.

ही आहे स्थिती ः

- पावसाचे प्रमाण अत्यल्प असलेल्या भागात मका पीक ताणावर.

- लष्करी अळीचा प्रादुर्भाव मका पिकावर जास्त.

- अळी पाने खत असल्याने पिकाचे नुकसान.

या तालुक्यांत प्रादुर्भाव :

येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड

Maize Army Worm
Maize Pest : मक्यातील अमेरिकन लष्करी अळी ची लक्षणे कशी ओळखायची?

शेतकऱ्यांनी असे करावे नियंत्रण :

मक्याच्या लागवडीमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळी लहान असल्यास निम अर्क किंवा अझेंडिरेक्टीन १० हजार पीपीएम १ लिटर १ मिली प्रमाणात वापर करावा. घरगुती निंबोळी उपलब्ध असल्यास ५ किलो निंबोळी कुटून ती रात्रभर भिजत घालावी. सकाळी वस्त्रगाळ करून ते आपण १०० लिटर पाणी या प्रमाणात वापरता येते. एकरी २०० लिटर पाणी वापर करावे. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढता आहे.

त्यांनी एकरी ८ कामगंध सापळ्यांचा वापर करावा. या वातावरणात मेटारायझीयम सारख्या मित्रबुरशीची ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात सकाळी किंवा शक्यतो संध्याकाळी फवारणी घावी. याशिवाय प्रादुर्भाव पातळी अधिक असल्यास स्पिनेटोरम (११.७ % एसी) ०.५ मि.ली. किंवा क्लोरॲंट्रानिलीप्रोल (१८.५% एससी) ०.४ मिली किंवा थायामेथोक्झाम १२.६% अधिक लॅंबडा सायहॅलोथ्रीन (९.५ %) ०.२५ मि.ली प्रति लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी, असा सल्ला निफाड कृषी संशोधन केंद्राचे कीटकशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. भालचंद्र म्हस्के यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com