Agriculture Advice : एकरी उत्पादकता वाढीवर लक्ष द्या

ZP Additional Chief Executive Officer Sandeep Kohinkar : ‘‘कोणत्या हंगामात, कोणत्या पिकांची लागवड करावी, त्यानुसार उत्पादनही घेतले जाते, पण आता शेतकऱ्यांनी एकरी उत्पादकता वाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे,’’
ZP Additional Chief Executive Officer Sandeep Kohinkar
ZP Additional Chief Executive Officer Sandeep Kohinkar Agrowon

Solapur News : ‘‘कोणत्या हंगामात, कोणत्या पिकांची लागवड करावी, त्याचे व्यवस्थापन कौशल्य हे सर्व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पूर्णपणे अवगत आहे. त्यानुसार उत्पादनही घेतले जाते, पण आता शेतकऱ्यांनी एकरी उत्पादकता वाढीकडे लक्ष देण्याची गरज आहे,’’ असे मत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सोमवारी (ता.१) येथे व्यक्त केले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषिदिन कार्यक्रमात श्री. कोहिनकर बोलत होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, ‘स्मार्ट’चे संचालक मदन मुकणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. व्ही. इंडी, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एन. बी. पाचकुडवे, निवृत्त कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, उपविभागीय कृषी अधिकारी मनिषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी आदी या वेळी उपस्थित होते.

ZP Additional Chief Executive Officer Sandeep Kohinkar
Agriculture Advice : पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये : बऱ्हाटे

श्री. कोहिनकर म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून आम्ही दरवर्षी शेतकऱ्य़ांसाठी विविध अवजारे वितरित करतो, त्याला प्रतिसादही चांगला मिळतो आहे. यंदा सुमारे ७५ टक्केपर्यंतच्या अनुदानावरील काही अवजारे वितरित केली. शेतकरी केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही नियोजन करतो, त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होतो आहे. पिकांचे उत्पादन, मार्केटिंग या बाबी महत्त्वाच्या आहेत. पण एकरी उत्पादकतावाढही महत्त्वाची आहे.’’

श्री. गावसाने म्हणाले, ‘‘कृषी विभाग कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. योजनांचा लाभ देण्यासह योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. दोघांमध्ये योग्य संवाद झाल्यास हे काम आणखी सोपे होईल.’’

ZP Additional Chief Executive Officer Sandeep Kohinkar
Agriculture Advice : पाऊस ७५ मिलिमीटर पडल्यावरच करा पेरणी

शेतकरी प्रतिनिधी म्हणून महिला शेतकरी जयश्री पाटील (शिंगडगाव), अंबिका म्हेत्रे (शिंगडगाव) यांनीही त्यांचे अनुभव या वेळी कथन केले. कक्ष अधिकारी विवेक लिंगराज, कृषी अधिकारी कल्याण श्रावस्ती यांनी सूत्रसंचालन केले. उपविभागीय कृषी अधिकारी मनिषा मिसाळ यांनी आभार मानले.

कृषी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

कृषी दिनाचे औचित्य साधून या वेळी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कृषिभूषण, कृषिरत्न, शेतीमित्र या पुरस्कारविजेत्यांसह पीकस्पर्धेतील पुरस्कार विजेते आणि कृषी विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com