Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Hackathon: ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’द्वारे कृषी क्षेत्रात नावीन्याची क्रांती!

Maharashtra Agriculture Innovation: राज्यातील शेतीसंबंधी समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Team Agrowon

Mumbai News: राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे.

या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. कृषी हॅकॅथॉन स्पर्धेच्या माध्यमातून नवकल्पक संशोधकांना संधी देण्याबरोबरच राज्यातील कृषिक्षेत्राला प्रगतीची आश्वासक दिशा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानभवनातील समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली देशातील पहिल्या ॲग्री हॅकॅथॉन स्पर्धेच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्य,

रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, प्रधान सचिव (व्यय) सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्यप्रणालीद्वारे), कृषी आयुक्त सूरज मांढरे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, संशोधक, तज्ज्ञ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की देशाची अर्थव्यवस्थेचा कृषी आणि कृषिपूरक उद्योगावर आधारीत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच कृषी क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे.

या माध्यमातून जलसंधारणासह सिंचनाच्या नव्या पद्धती, शाश्वतशेतीसाठी आधुनिक उपाययोजना, कीटकनाशक आणि जैविक खतांचे वैज्ञानिक उपयोग, शेतमालाची विक्रीसाखळी सुधारण्यासाठी ई-मार्केटिंग आदी उपाय करण्यात येणार आहेत. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Fake Seeds: अहिल्यानगरमध्ये बोगस कपाशी बियाण्यांचा गैरप्रकार; शेतकऱ्यांचे नुकसान, शासनाचे कडक कारवाईचे आश्वासन

Kharif Sowing : मराठवाड्यात ४५ लाख ७० हजार हेक्टरवर पेरणी

Mangrove Conservation : कांदळवन संवर्धनातून साकारतेय हरित अर्थव्यवस्था

Improved Crop Variety : महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे विकसित पिकांचे सुधारित वाण

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ नव्हे, हा तर स्वार्थपीठ महामार्ग : राजू शेट्टी

SCROLL FOR NEXT