
Washim News : एस्पिरेशनल ते इन्स्पिरेशनल ही कृषीच्या बळावर वाशीमची नवी ओळख घडवणार असल्याचा संकल्प जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि पौष्टिक तृणधान्य योजना अंतर्गत दोन दिवसीय जिल्हास्तरीय शेतमाल विक्री महोत्सव घेण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि कृषी उपसंचालक अजय मोरे, हीना शेख, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजित देवगिरकर, करडा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, डी. डी. गीते, रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती बुवनेश्वरी पुढे म्हणाल्या, की नीती आयोगाने वाशीमला ‘ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट’ म्हणून घोषित केले आहे. पण आम्ही कृषी उत्पादनाच्या माध्यमातून ही ओळख पुसून जिल्ह्याला ‘इन्स्पिरेशनल डिस्ट्रिक्ट’ बनवण्याचा निर्धार केला आहे. गेल्या दोन वर्षांत चिया लागवडीचे क्षेत्र १०० हेक्टरवरून ३ हजार ६०० हेक्टरपर्यंत वाढले आहे.
आज वाशीम चिया लागवडीत देशात प्रथम क्रमांकावर आहे, हे अभिमानास्पद आहे. यासाठी कृषी विभाग, शेतकरी आणि खरेदीदार कंपन्या अभिनंदनास पात्र आहेत. शेतकऱ्यांना कमी पाण्यात चांगले पीक आणि योग्य मोबदला मिळावा, यासाठी नावीन्यपूर्ण पिकांची लागवड पुढेही सुरू राहील.
श्री.लहाळे म्हणाले, की बुवनेश्वरी एस. यांच्यासारख्या जिल्हाधिकारी मिळणे हे वाशीमचे भाग्य आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी इतके प्रयत्न करणारे अधिकारी दुर्मिळ असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा कृषी क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. चिया लागवडीतील यश हे त्यांच्याच दूरदृष्टीचे फळ आहे.
प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी चिया पिकाची संकल्पना जिल्हाधिकारी यांचीच असे सांगत कमी पाणी, कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. अवघ्या दोन वर्षांत वाशीम देशात चिया उत्पादनात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. चिया पिकासाठी खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले. यात राज्यातील आणि राज्याबाहेरील खरेदीदारांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना शेख व गोपाल मुठाळ यांनी केले. आभार संतोष वाळके यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.