Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Death : कापूस पट्ट्यातील नैराश्‍याचे लोण आता संत्रा पट्ट्यात

Orange Growers : कापूस पट्ट्यातील आत्महत्यांचे लोण आता संत्रा पट्ट्यातही पोहोचले आहेत.

Team Agrowon

Amravati News : कापूस पट्ट्यातील आत्महत्यांचे लोण आता संत्रा पट्ट्यातही पोहोचले आहेत. नैसर्गिक कारणांमुळे घटलेली उत्पादकता, बांगलादेशकडून आयात शुल्कात वाढीच्या परिणामी घसरलेले दर यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने घराबाहेर पडत मजुरीचा निर्णय घेतला. परंतु तेथेही निराशाच हाती आल्याने हतबलतेतून चंद्रपूर जिल्ह्यातील एका विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविले.

जरुड तालुक्‍यातील शेतकरी पद्माकर बापूराव दारोकर (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे जेमतेम दिड एकर शेती आहे. या संपूर्ण शिवारात संत्रा लागवड असून हाच एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत आहे. यंदा मात्र सुरुवातीला फळगळतीचा सामना त्यांना करावा लागला.

त्यानंतरच्या काळात वाचलेल्या फळांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असताना बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केली. त्याचाही फटका संत्रा बागायतदारांना बसला. देशांतर्गंत मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी संत्र्याचे दर पाडले. परिणामी, पद्माकर दारोकार यांच्या अडचणीत आणखीच भर पडली.

त्यामुळेच त्यांनी बागेतील फळांचा सौदा केला नव्हता. काहीतरी काम करून पैशाची गरज भागवू आणि त्यानंतर दरात तेजी येईल त्यावेळी बागेचा सौदा करू, असे ठरवित ते चंद्रपूर जिल्ह्यात जायचे ठरवले.

या जिल्ह्यातील एखाद्या कंपनीत मजुरी करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु तेथेही निराशाच हाती आल्याने त्यांनी पिंपळगाव (चंद्रपूर) येथील प्रशांत सपकाळ यांच्या शेतातील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

शासनाने संत्रा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. निर्यात अनुदानाबाबत स्पष्टता नाही, प्रक्रिया उद्योगही कागदावरच आहेत. त्यामुळे संत्रा पट्ट्यात नैराश्‍य निर्माण झाले आहे. अपेडा, एनडीडीबी यांनी संत्रा बाजारात हस्तक्षेप करावा. त्यांना शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ग्रेडिंग, कोटिंग केलेला संत्रा द्यावा, अशी साखळी विकसित होणे गरजेचे आहे. त्याशिवाय या भागातील अस्थिरता दूर होणार नाही.
- ॲड. धनंजय तोटे, अध्यक्ष, महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघ
संत्रा उत्पादकांच्या प्रश्नांवर बैठक घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते. मात्र या बैठकीचा अद्याप मुहूर्त निघाला नाही. परिणामी संत्रा पट्ट्यात समस्या गंभीर होत आहेत.
- बच्चू कडू, आमदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT