Farmer Death : शासनाच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ

Government Policy : गरिबी, बेरोजगारीमुळे जगणे असह्य झाले आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादकतेची हमी उरली नाही. यातूनच आत्महत्या वाढल्या, याला आधार देण्याचे काम राज्य सरकारचे आहे.
Farmer Death
Farmer DeathAgrowon

Nagpur News : गरिबी, बेरोजगारीमुळे जगणे असह्य झाले आहे. सातत्याने निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीतून उत्पादकतेची हमी उरली नाही. यातूनच आत्महत्या वाढल्या, याला आधार देण्याचे काम राज्य सरकारचे आहे. परंतु ‘इव्हेंटप्रेमी’ सरकारकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून स्वतःच्या प्रचारासाठी ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम राबविला जात असल्याची जोरदार टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Farmer Death
Winter Session : हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकटवले, महायुती सरकारच्या चहापानावर बहिष्कार

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर रविभवन परिसरात बुधवारी (ता. ६) महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्‍त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, आमदार राजेश राठोड उपस्थित होते.

Farmer Death
Assembly Winter Session : सरसकट नुकसान भरपाई द्या! गळ्यात संत्र्याच्या माळा घालून महाविकास आघाडीचे विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन

वडेट्टीवार म्हणाले, ‘‘ पावसाने धान, संत्रा, तूर, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले. नेहमीप्रमाणे मदतीची घोषणा करण्यात आली. मात्र गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याचे चित्र आहे. विमा भरपाई, शासन अनुदान, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन रक्‍कम देण्याचाही विसर ‘इव्हेंटप्रेमी’ सरकारला पडला आहे. या सर्व मुद्द्यावरून सरकारला घेरणार आहोत.’’

विदर्भ-मराठवाडा विकासाच्या गप्पा सत्ताधाऱ्यांकडून मारल्या जातात. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी १४ हजार कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठीच सरकारकडे पैसे नसल्याचे समोर आले आहे. दूधदर २२ रुपयांवर आला आहे. ‘महानंद’ बंद करण्याची खेळी खेळली जात आहे. कांदा अनुदान, दिवाळीपूर्वी विमा अग्रिम यातील काहीच मिळाले नाही. आणेवारी आधारित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी असणार आहे.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com