Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Agriculture Logo : बोधचिन्ह निवड समितीत शेतकऱ्यांचाही समावेश

Agriculture Department Logo Committee Maharashtra : कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, चार दशकापासून अस्तित्वात असलेल्या सध्याच्या बोधचिन्हामध्ये आधुनिक शेतीमधील तंत्रज्ञान, शाश्वत शेती याविषयीची ओळख दिसून येत नाही.

Team Agrowon

Pune News : कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत पंजाबराव देशमुख पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. बोधचिन्हाचे मूल्यांकन व निवड प्रक्रिया राबविण्यासाठी राज्याचे विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे.

समितीत पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्राप्त पुरुष शेतकरी व महिला शेतकरी यांचा समावेश असेल. याशिवाय कला महाविद्यालयाचे प्राध्यापक, पुण्याचे विभागीय माहिती उपसंचालक या समितीत काम करतील. कृषी आयुक्तालयाच्या माहिती विभागाचे उपसंचालक या समितीचे सदस्य सचिव असतील.

कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह तयार करताना नवे घोषवाक्यदेखील निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातून प्रस्ताव मागवले जात आहेत. समितीकडून तीन बोधचिन्ह व तीन घोषवाक्य निवडून अंतिम मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठवले जातील. सर्वोत्कृष्ट बोधचिन्हासाठी एक लाखाचे बक्षीस घोषवाक्यासाठी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, चार दशकापासून अस्तित्वात असलेल्या सध्याच्या बोधचिन्हामध्ये आधुनिक शेतीमधील तंत्रज्ञान, शाश्वत शेती याविषयीची ओळख दिसून येत नाही.

कृषी विभागाने स्वीकारलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता, ॲग्रीस्टॅक, कृषी प्रक्रिया, हवामान बदल, जैवविविधता या धोरणांचे प्रतिबिंब बोधचिन्हात उमटलेले नाही. त्यामुळे नव्या पिढीतील शेतकरी, उद्योजक यांना प्रेरणादायी ठरणारे नवे बोधचिन्ह व घोषवाक्य स्वीकारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

३८ वर्षानंतर मिळणार नवे बोधचिन्ह

राज्यात कृषी विभागाची स्थापना १८८३ मध्ये ब्रिटिशांनी केली होती. विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतरही कृषी विभागाने बोधचिन्ह किंवा घोषवाक्य स्वीकारले नाही. १९८७ मध्ये कृषी विभागाच्या शेतकरी मासिकात एक बोधचिन्ह प्रसिद्ध झाले व तेच पुढे आजतागायत कायम राहिले. सध्याचे बोधचिन्ह कालबाह्य ठरल्यानंतरदेखील ते बदलण्याची तसदी घेतली जात नव्हती. चूक लक्षात आल्यानंतर आता कालसुसंग, प्रभावी व सर्जनशील बोधचिन्ह स्वीकारण्याचा निर्णय घेत निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT