Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

Save Tribal Villages: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी ही दोन गावे इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहेत; मात्र अनेक वर्षांपासून येथे दगडखाण सुरू होती.
Landslide Risk
Landslide RiskAgrowon
Published on
Updated on

Badalapur News: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी ही दोन गावे इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहेत; मात्र अनेक वर्षांपासून येथे दगडखाण सुरू होती. सरकारचे सगळे नियम धाब्यावर बसवून चालू असणाऱ्या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याची भीती आहे.

त्यामुळे येथील गावे व जवळील आदिवासी वस्तीतील गावकरी भयभीत झाले होते. अखेर यासंदर्भात वनशक्तीने दखल घेत आवाज उठवला. त्यावर उच्च न्यायालयाने नुकताच या दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने तब्बल १९० कोटींचा दंड ठोठावला आहे. राज्यातील एखाद्या दगडखाणीला सुनावलेला हा सर्वाधिक दंड असल्याचे म्हटले जात आहे.  

Landslide Risk
Health Risks Of Overeating : ओव्हरइटिंग करताय? आत्ताच थांबा! भोगावे लागतील गंभीर परिणाम

चिंचवली व कोपऱ्याची वाडी या ठाकूर या आदिवासी समाजाच्या दोन्ही वाड्यांमध्ये एकूण ८५ घरे आहेत. जवळपास ८०० हून अधिक लोकसंख्या या दोन्ही वाड्यांत आहे. त्यांना दगड खाणीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता, जो आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे थांबला आहे.अंबरनाथ तालुक्यातील तासगावजवळील चिंचवली व कोपऱ्याची वाडी या ठाकूर समाजाच्या आदिवासी वस्तीच्या वरच्या डोंगरावर जवळपास २००८ पासून दगडखाण आहे.

Landslide Risk
Bridge Collapse Risk: सांगवी सांडस बंधारा धोकादायक

खाण सुरू झाल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात होते. काही वर्षांत शासनाचे नियम धाब्यावर बसवून सायंकाळी सहानंतरही जोरदार उत्खनन केले जात होते. यामुळे येथील गावकऱ्यांच्या घरांना तडे जाण्याचेही प्रकार घडत होते. या खाणीमुळे या आदिवासी वस्तीतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धूळ साचली होती. 

दगडखाण बंद होणार आहे. त्यामुळे आमची आरोग्यसंदर्भात होत असलेली हानी थांबणार आहे. शिवाय आम्ही आता भयमुक्त वातावरणात राहणार आहोत. ज्या निसर्गाची आमच्यावर कृपादृष्टी आहे, त्याच निसर्गरम्य वातावरणात आता आम्ही पुन्हा जगणार आहोत. 
- भास्कर वरघडा, ग्रामस्थ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com