
Nashik News: बागलाण तालुक्यात मोसम खोऱ्याचे वरदान असलेले हरणबारी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे द्वारकाधीश कारखान्याचे वतीने जलपूजन करण्यात आले. कारखान्याचे संगणक विभाग प्रमुख राकेश निकम, त्यांच्या पत्नी कोमल यांच्याहस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले.
कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव भालेराव यांनी कार्यक्षेत्रातील उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले, की चालू वर्षी मे महिन्यापासूनच पावसाळा सुरुवात झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील काम चालू आहेत.
सालाबादानुसार चालूवर्षी धरण एक महिना अगोदरच भरल्यामुळे मोसम, करंजाडी, तुंगाडी, सोळागाव काटवण खोऱ्यामधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत, कार्यकारी संचालक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे.
यावर्षी कारखान्यास भारतीय शुगर यांच्याकडून ’बेस्ट ओहर ‘ऑल परफॉर्मन्स बेस्ट मॅनेजमेंट’ हा देश पातळीवरील पुरस्कार जाहीर झालेला असल्याचे सांगितले. यावेळी ऊस उत्पादक के.पी.जाधव, साहेबराव साळवे, सुधाकर महाजन, प्रभाकर पाटील, सागर पगारे, सोनू
पाटील,गंपू चौरे, रामदास नंदन, पवळू चौधरी, पंडित सूर्यवंशी, सुनीता गर्गे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी बाळासाहेब करपे, विजय वाघ,भूषण नांद्रे, अरविंद सोनवणे, विजय पगार, किरण भवर, कैलास वाघ, सतीश सोनवणे, हेमंत सोनवणे, उद्धव नहिरे उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.