Agriculture Department: कृषिमंत्र्यांना मिळेनात पूर्णवेळ सचिव

Government Appointments : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना अद्याप पूर्णवेळ खासगी सचिव मिळालेले नाहीत. त्यांचे सध्याचे खासगी सचिव, संतोष पाटील, हे सहकार विभागाचे सहसचिव म्हणूनही काम पाहत असल्याने, कृषी विभागाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या खासगी सचिव आणि इतर कर्मचारी वर्गावर थेट मुख्यमंत्री कार्यालयातून मोहर लागली याला आता सहा महिने होत आले. मात्र कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खासगी सचिव संतोष पाटील यांना मात्र सहकार विभागाचे सहसचिव आणि कृषी मंत्रालयाचा कारभार पाहावा लागत आहे. साखर आयुक्तालयातील संचालक यशवंत गिरी यांची सहकार विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती झाली असूनही ते अद्याप हजर झालेले नाहीत.

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या यादीवर मुख्यमंत्री कार्यालयातून मोहर लावण्यात आली. यातील काही अधिकारी आणि कर्मचारी मूळ विभागातून बदलून तर काही उसनवारी तत्त्वावर हजर झाले आहेत. कृषिमंत्री कोकाटे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबरोबरच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सुशील आगरकर यांचीही नियुक्ती करण्यात आली.

Agriculture Department
Agriculture Department : सुधारित आकृतिबंध नव्या अधिकाऱ्यांवर अन्यायकारक

पाटील हे सहकार विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे खासगी सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जिल्हा उपनिबंधक ते सहकार विभागाचे सहसचिव अशी त्यांची सहकार विभागातील कारकीर्द आहे. सहकार कायद्यातील खाचाखोचा माहीत असलेले आणि नियमानुसार काम करणारे अधिकारी अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच ते कोकाटे यांच्याकडे खासगी सचिव म्हणून नियुक्त झाले असले तरीही सहकार विभाग त्यांना कार्यमुक्त करण्यास तयार नाही.

Agriculture Department
Agriculture Department: गुणनियंत्रण संचालकाची नियुक्ती मॅटकडून रद्द

सध्या कृषी विभागाने काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये पुनर्रचित पीक विमा योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, ‘पोकरा’च्या धर्तीवरील योजना, ‘एनडीव्हीआय’च्या निकषानुसार नुकसानीचे पंचनामे आदी योजनांवर काम सुरू आहे. मात्र पाटील यांना दोन विभागांचा कारभार पाहावा लागत असल्याने त्यांची तारांबळ होत आहे.

३० मे रोजी साखर आयुक्तालयातील संचालक यशवंत गिरी यांची सहकार विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र, त्यांनी अद्याप कार्यभार स्वीकारलेला नाही. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत मात्र, साखर आयुक्तालयातील कार्यभार अद्याप कुणाकडे न दिल्याने मी रुजू झालो नाही. येथून कार्यमुक्त झाल्यानंतर तातडीने रुजू होईन, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com