Watermelon Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Watermelon Cultivation : आगाप कलिंगडास फटका; लागवड सुरूच

Watermelon Crop Damage : खानदेशात यंदा २० नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीस सुरुवात झाली आहे. कलिंगडाची लागवड सुरूच असून, आगाप किंवा नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या पिकाची हानी विषम वातावरण व डिसेंबरअखेरीस आलेल्या पावसाने झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा २० नोव्हेंबरपासून कलिंगड लागवडीस सुरुवात झाली आहे. कलिंगडाची लागवड सुरूच असून, आगाप किंवा नोव्हेंबरमध्ये लागवडीच्या पिकाची हानी विषम वातावरण व डिसेंबरअखेरीस आलेल्या पावसाने झाली आहे.

आगाप कलिंगड पिकात फळे संख्या कमी आहे. तसेच पीक फुलोऱ्यावरही फारसे येत नसल्याची स्थिती असून, फळ व फुलांची संख्या वाढविण्यासाठी शेतकरी विविध फवारण्या घेत आहेत. परागीभवनासाठी मधमाशा पिकात याव्यात यासाठी पिकात गूळ ठेवणे, विविध फवारण्या घेणे अशी कार्यवाही सुरू आहे. आगाप कलिंगड पिकात फळे कमी लागत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

आगाप कलिंगड फुलधारणा स्थितीत येत असतानाच डिसेंबरमध्ये ढगाळ वातावरण होते. थंडीही मध्यंतरी होती. त्यात डिसेंबरच्या अखेरीस जोरदार पाऊस खानदेशात झाला. याचा फटका अनेक भागांत पिकांना बसला आहे.

हलक्या, मुरमाड क्षेत्रातील कलिंगड पिकाची अतिपावसात हानी झाली आहे. कलिंगड पिकास सुरुवातीला कमी पाणी लागते. परंतु अतिपावसाने समस्या तयार झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कलिंगडात मागील हंगामात अनेकांना नफा बरा हाती आला होता. मागील वेळेस कलिंगडाची लागवडदेखील कमी होती. परंतु यंदा कलिंगड लागवडीत खानदेशात मोठी वाढ झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील लागवड पाच हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. तर धुळे व नंदुरबारमध्येही मोठी कलिंगड लागवड झाली आहे. लागवड अजूनही सुरूच आहे. सध्या उन्हाळ हंगामासंबंधीची लागवड सुरू आहे.

जळगाव जिल्ह्यात जामनेरात सर्वाधिक कलिंगड पीक आहे. तसेच चोपडा, यावल, रावेर, जळगाव, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा व नंदुरबार भागात कलिंगडाची मोठी लागवड झाल्याची स्थिती आहे.

या महिन्यात कलिंगडाची मोठी लागवड झाली आहे. डिसेंबरमध्ये अनेकांनी लागवड टाळली. त्यात २५ ते २९ डिसेंबर या कालावधीत खानदेशात पाऊस झाल्याने कलिंगड लागवड होऊ शकली नाही. ही लागवड चालू महिन्यात झाली.

दर टीकून राहण्याची अपेक्षा

अनेक शेतकरी हलक्या, मध्यम जमिनीत कलिंगडाची लागवड करीत आहेत. अधिक पाने व फुले लागणाऱ्या वाणांना पसंती आहे. अनेकांच्या पिकात पुढील महिन्याच्या अखेरीस काढणी होईल. दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. कारण अनेक भागांत पिकाची हानी रोगराई व पावसाने झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

Kharif Sowing: खरीप पेरण्यांत बारामती उपविभाग अव्वल

Maharashtra Agriculture Minister: कृषिमंत्री कोकाटे खानदेश दौरा अर्धवट सोडून परतले

Agri Officers Support: कृषिमंत्र्यांच्या समर्थनासाठी कृषी अधिकारी सरसावले

SCROLL FOR NEXT