Team Agrowon
कमी क्षेत्रात, कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि टिकाऊपणा या गुण वैशिष्ट्यांमुळे कलिंगड लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडांना जास्त मागणी असते.
सर्वात पहिल्यांदा कलिंगड लागवडीसाठी जमिनीची निवड करताना चिबड, चोपण जमिनीत लागवड करणे टाळाव. अशा जमिनीत विद्राव्य क्षारांच प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता असते.
भारी जमिनीत लागवड केल्यास वेलींची वाढ जास्त होते. तसेच जमीन आणि पाणी यामध्ये समतोल न राखल्यास फळांना भेगा पडण्याची शक्यता असते.
कलिंगड लागवडीसाठी रेताड, मध्यम काळी पोयट्याची किंवा गाळाच्या आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. अशा जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा.
नवीन लागवड केलेल्या फळबागातील रिकाम्या जागेत या फळांची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीपुर्वी जमिनीची उभीआडवी नांगरणी करून घ्यावी.
नंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
कुळव्याच्या पाळीवेळी उपलब्ध असेल तर हेक्टरी ३० ते ४० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
Sugarcane Trash Management : ऊस पाचट कुजविण्याचे तंत्र