Watermelon Cultivation : कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन देणाऱ्या कलिंगडाचे लागवड तंत्र

Watermelon Farming : उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडांना जास्त मागणी असते. कलिंगडाची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास जास्त उत्पादन मिळविणे शक्य होत.
Watermelon
WatermelonAgrowon
Published on
Updated on

Watermelon Crop : कलिंगड आणि खरबूज ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडते फळ आहेत. यापैकी कमी क्षेत्रात, कमी गुंतवणुकीत जास्त उत्पादन आणि टिकाऊपणा या गुण वैशिष्ट्यांमुळे कलिंगड लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगडांना जास्त मागणी असते. कलिंगडाची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास जास्त उत्पादन मिळविणे शक्य होत.

सर्वात पहिल्यांदा कलिंगड लागवडीसाठी जमिनीची निवड करताना चिबड, चोपण जमिनीत लागवड करणे टाळाव. अशा जमिनीत विद्राव्य क्षारांच प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. तर भारी जमिनीत लागवड केल्यास वेलींची वाढ जास्त होते. तसेच जमीन आणि पाणी यामध्ये समतोल न राखल्यास फळांना भेगा पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कलिंगड लागवडीसाठी रेताड, मध्यम काळी पोयट्याची किंवा गाळाच्या आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी.

Watermelon
Methi Cultiavtion : कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या मेथीची अशी लागवड करा

अशा जमिनीचा सामू ६.५ ते ७.० दरम्यान असावा. याशिवाय नवीन लागवड केलेल्या फळबागातील रिकाम्या जागेत या फळांची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीपुर्वी  जमिनीची उभीआडवी नांगरणी करून घ्यावी. नंतर कुळवाच्या २ ते ३ पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. कुळव्याच्या पाळीवेळी उपलब्ध असेल तर हेक्‍टरी ३० ते ४० गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

लागवड ः

कलिंगड पिकाचा कालावधी हा जातिनूसार ९० ते ११० दिवसांचा असतो. लागवड साधारण जानेवारी ते फेब्रुवारी करतात. लागवड आळे पद्धतीने २ बाय ०.५ मीटर अंतरावर करावी.  लागवडीसाठी हेक्टरसाठी २.५ ते ३ किलो तर एकरी १ ते १.२५ किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सुधारित वाणापैकी शुगर बेबी, असाही यामाटो, अर्का माणिक आणि अर्का ज्योती हे वाण उपलब्ध आहेत तर संकरित वाणांपैकी अर्का ज्योती, संतृप्ती आणि अमृत वाण उपलब्ध आहेत.

लागवड करण्यापूर्वी बियाणे किमान १२ तास कोमट पाण्यात भिजवाव. नंतर रात्रभर बियाणे ओल्या बारदानात बांधून ठेवाव. असं केल्यानं उगवण चांगली होते. लागवडीपूर्वी प्रतिकिलो बियाणांस कार्बेन्डाझिम २.५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे चोळावं. लागवड करण्यापूर्वी पाण्याने आळी चांगली भिजवून घ्यावीत. वाफसा आल्यावर आळ्यामध्ये तीन ते चार बिया १.५ ते २ सेंमी खोल लावाव्यात. खत व्यवस्थापनाचा विचार केला तर खताची मात्रा ही जमिनीची सुपीकता, हवामान, हंगाम यावर अवलंबून असते.

हेक्टरी १०० किलो नत्र म्हणजेच युरिया २१७ किलो, ५० किलो स्फुरद म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो आणि ५० किलो पालाश म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो प्रमाणे द्यावे. शिफारशीत मात्रेपैकी नत्राची अर्धी मात्रा आणि संपूर्ण स्फुरद, पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उर्वरित नत्र लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी वेल शेंडा धरू लागल्यावर द्यावे. संकरित वाणांकरिता खताची मात्रा वेगळी राहते. नदीपत्रात लागवड करताना वेलींची उगवण झाल्यानंतर पंधरा दिवसांनी १०० ग्रॅम अमोनिअम सल्फेट द्यावे. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा १० ग्रॅम अमोनियम सल्फेट वेलीला देऊन भर द्यावी. फळांचे जास्त प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी वेलीवर मादी फुलांची संख्या जास्त असणे आवश्यक असते.

काही संजीवकांचा कार्यक्षम वापर करून मादी फुलांची संख्या वाढविता येते. वेलीची दोन पाने अवस्था असताना शिफारशीप्रमाणे संजीवकांची फवारणी करावी. याशिवाय बोरॉन आणि मॉलिब्डेनम (३ पीपीएम आणि कॅल्शिअम या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फवारणी केल्यास उत्पादनात वाढ मिळते. तसेच फळे चांगली तयार होतात. बी उगवण झाल्यानंतर कीडग्रस्त व रोगट रोपे उपटून घ्यावीत. आणि नांग्या भराव्यात. उगवण झाल्यावर वेल पूर्ण वाढीला लागेपर्यंत (२० ते २५ दिवस) तण काढून शेत भुसभुशीत ठेवावे. वेलींजजजज९ना वेळोवेळी भर द्यावी. तसेच वेलींना वळण देऊन गादी वाफ्यावर घ्यावे. म्हणजे फळे पाण्याने खराब होणार नाहीत. पिकाच्या वाढीसाठी नियमित आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा अवश्य करावा. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे फळे तडकण्याची शक्यता असते. फळे कुजू नयेत म्हणून सिंचन करतेवेळी फळांचा पाण्यासोबत संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. फळाच्या वाढीच्या काळात वेलांना पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे कलिंगडाची लागवड केल्यास नक्कीच कलिंगडांच चांगल उत्पादन मिळेल.

--------------------------------------------------

माहिती आणि संशोधन - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com