Fertilizer Selling Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Selling : खतांची जादा दराने विक्री केल्यास कारवाई

Selling Fertilizer at Higher Rates : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असून पावसाला अद्याप सुरुवात न झाल्याने पेरण्यांना विलंब झाला आहे. हंगामासाठी ८४ हजार २०७ टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही.

Team Agrowon

Sangli Fertilizer Rate : सांगली जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असून पावसाला अद्याप सुरुवात न झाल्याने पेरण्यांना विलंब झाला आहे. हंगामासाठी ८४ हजार २०७ टन खत उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना आवश्यक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही.

केंद्राने खतांचे दर निश्चित केलेत. तेव्हा जादा दराने खतांची विक्री करू नये. तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिला.

यंदा पावसाला अद्याप सुरुवात न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र हंगामासाठी कृषी विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यात २ लाख ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे.

हंगामासाठी ८९ हजार टन खत लागणार आहे, तर ३८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. सरकारी व खासगी कंपन्यांकडून खते, बियण्यांचा पुरवठा सुरू झाला आहे. खरिपात खते व बियाण्यांची टंचाई निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेतली जात आहे.

शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये आजअखेर रासायनिक खतांच्या ८९ हजार २३० टन मागणीपैकी ८४ हजार २०७.८५ टन खते उपलब्ध झाली आहेत. हंगामासाठी खतांचा साठा पुरेसा आहे.

जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. चालू खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचे प्रतनिहाय दरपत्रक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी देण्यात आहे.

...असे आहेत खतांचे दर

सर्वाधिक लागणाऱ्या डीएपीच्या ५० किलोच्या पोत्यासाठी २३५० रुपये, युरिया ४५ किलोचे पोते २६६.५० रुपये, एमओपी १७५० रुपये, १०ः२६ः२६ साठी १४७० रुपये, १२ः३२ः१६ साठी १४७० रुपये, २४ः२४ः०० साठी १७०० रुपये, २०ः२०ः१३ साठी १३०० रुपये, २०ः२०ः१३ आरसीएफसाठी १३०० तर २०ः२०ः१३ इफकोची १२०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

खते एमआरपी किमतीहून अधिक दराने खरेदी करू नयेत. अनुदानित रासायनिक खतांची विक्री एमआरपीहून अधिक दराने होत असल्यास शेतकन्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुंभार यांनी केले आहे.

सरकारने निश्चित केलेले खतांचे दर

खत - दर

युरिया - २६६.५० रुपये

डी.ए.पी.- १३५० रुपये

एम.ओ.पी. - १७०० रुपये

१०:२६:२६ - १४७० रुपये

१२:३२:१६ - १४७० रुपये

२४:२४:००- १७०० रुपये (पी.पी.एल.)

१४:२८:१४ - १७९५ रुपये (पी.पी.एम.)

२४:२४:०:०८ - १५०० रुपये (मंडन)

१४:३५:१४ १० - १५०० रुपये (कोरोमंडल)

२४:२४:०:०८ - १७०० रुपये (महाधन)

२०:२०:०:१३ - १२०० रुपये (महाधन)

१४:२८:०० - १४९५ रुपये (महाधन)

१३ ०९:२४:२४ - १७९० रुपये (महाधन)

१५:१५:१५ - १७५० (महाधन)

२०:२०:०:१३ - १३०० (आर. सी. एफ.)

२०:२०:०:१३ - १२०० (इफको)

२०:२०:०:१३ - १२५० (आयपीएल)

२०:२०:०:१३ - १२०० (चंबल)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

SCROLL FOR NEXT