Bio Fertilizer : ‘वनामकृवि’मध्ये द्रवरूप जिवाणू खते विक्रीसाठी उपलब्ध

Organic Farming : जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन उत्‍पादनात वाढ होते, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. अनिल धमक यांनी दिली.
Bio Fertilizers
Bio FertilizersAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय मृदा जैव विविधता-जैविक खत प्रकल्पातर्फे निर्मित विविध पिकांसाठी उपयुक्त द्रवरूप जिवाणू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

द्रवरूप जिवाणू खताचे दर प्रतिलिटर ३७५ रुपये आहेत. जिवाणू खतांमुळे पिकांना दिलेल्‍या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होऊन उत्‍पादनात वाढ होते, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. अनिल धमक यांनी दिली.

त्यात रायझोबीयम, ॲझोटोबक्टर, स्फुरद विरघळवीणारे, वहन करणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळवीणारे जिवाणू खत, गंधक विघटन करणारे व जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) व ॲझोटोफॉस (ॲझोटोबक्टर व पीएसबी मिश्रण) आदींचा समावेश आहे.

रायझोबियम या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे सोयाबीन, मूग, हरभरा, भुईमूग, तूर, उडीद आदी पीक उत्पादनात २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होते. अॅझोटोबक्टर या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होते.

तृणधान्ये, गळीतधान्ये, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापूस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी ॲझोटोबक्टर, पीएसबी व पालाश विरघळवीणारे जिवाणू खत (बायो-एनपीके) यांचे एकत्रित मिश्रण वापरता येते.

Bio Fertilizers
Bio Diesel Policy : जैवइंधन धोरणावर आज राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

द्रवरूप जिवाणू खतांचा असा करा वापर...

ज्वारी, तूर, बाजरी, मका, कापूस, गहू, साळ आदी पिकांमध्‍ये बीजप्रक्रियेसाठी अॅझोटोफॉस (ॲझोटोबॅक्टर व पीएसबी मिश्रण) २०० मिलि जिवाणू संवर्धने प्रति १० किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी. सोयाबीन, भुईमूग, तूर, मूग, उडीद, हरभरा इत्‍यादी मध्‍ये रायझोफॉस (रायझोबियम व पीएसबी मिश्रण) हे जिवाणू संवर्धन बीजप्रक्रियेसाठी वापरता येते.

सोयाबीन व भुईमूगकरिता १०० मिलि जिवाणू संवर्धने प्रति १० किलो तर तूर, मूग, उडीद, हरभऱ्याकरिता २०० मिलि जिवाणू संवर्धने प्रति १० किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी. हळद, ऊस, केळी, आले, टरबूज, खरबूज, फळझाडे आदी फळपिकांकरिता उपयुक्‍त आहेत.

Bio Fertilizers
Bio Fertilizers : जैविक खतांमुळे अन्न सुरक्षा धोक्यात?

ठिबक संचाद्वारे एकरी २ लिटर द्रवरूप जिवाणू संवर्धने वेंचुरी टॅंकमध्ये टाकून पिकास द्यावे. उभ्या पिकास पिकाच्या मुळाभोवती बायो-एनपीके हे जिवाणू संवर्धन देता येते. २०० मिलि द्रवरूप जिवाणू संवर्धने १५ लिटर नोझल काढलेल्या पाठीवरच्या फवाऱ्याच्या साह्याने मुळाभोवती आळवणी करावी. एक एकरासाठी १० फवाऱ्याच्या टाक्या किंवा २ लिटर प्रति एकर याचा वापर करावा.

जिवाणू खताच्या बाटल्या उष्ण ठिकाणी किंवा थेट सूर्य प्रकाशात ठेवू नयेत. द्रवरूप जिवाणू खते कीटकनाशके, बुरशीनाशके, किंवा रासायनिक खतासोबत मिसळू नयेत. द्रवरूप जिवाणू खते लावल्यानंतर थोडा वेळ सावलीत वाळवावीत. जमिनीत दिल्यानंतर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जमिनीत ओल असणे आवश्यक आहे, असे डॉ. धमक यांनी सांगितले. अधिक माहिती संपर्क ः प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. अनिल धमक (९४२००३३०४६), सय्यद मुन्शी (९९६०२८२८०३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com