Land Map Agrowon
ॲग्रो विशेष

Land Information Map : जमिनीची माहिती देणारा नकाशा तयार

Information on Land Structure : ‘‘राज्यातील १५ जिल्ह्यांच्या जमीन संरचनेची माहिती देणारा खास जमीन नकाशा तयार करण्यात आला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘‘राज्यातील १५ जिल्ह्यांच्या जमीन संरचनेची माहिती देणारा खास जमीन नकाशा तयार करण्यात आला आहे. या अभिनव अशा जमीन नकाशा पत्रिकेचे प्रकाशन अकोला कृषी विद्यापीठात आयोजित संयुक्‍त संशोधन परिषदेत होईल,’’ अशी माहिती राष्ट्रीय मृदा विज्ञान व जमीन उपयोगिता संस्थेचे संचालक डॉ. नितीन पाटील यांनी दिली.

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘विदर्भातील बहुतांश माती ही कापसासाठीची काळी जमीन आहे. यामध्ये ४० ते ७५ टक्‍के चिकणपणा (क्‍ले पार्टिकल) राहतो. ही माती पाणी आल्यानंतर प्रसरण पावते आणि पाणी नसल्यास आकुंचन पावते. त्यामुळे उन्हाळ्यात हिला भेगाही पडतात आणि पावसाळ्यात त्या भरतात देखील.

पहिल्या महिन्याच्या पावसात भेगा भरल्यानंतर मातीच्या गुणधर्मामुळे त्या पुढील टप्प्यात पाणी आत झिरपत नाही आणि ते वरच्या बाजूस साचून राहिल्याने पूर येतो. मराठवाड्यातील माती त्या तुलनेत कमी चिकणपणाची आहे. परिणामी या भागात दुष्काळस्थिती अधिक राहते.’’

‘‘संस्थेच्या वतीने पहिल्या टप्प्यात विदर्भातील ११, मराठवाड्यातील चार अशा १५ जिल्ह्यांच्या जमीन नकाशाचे काम हाती घेण्यात आले. सॅटेलाइटकडून प्राप्त माहितीचे पृथक्करण, प्रत्यक्ष बांधावर संकलित नमुने या आधारे हा नकाशा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

३० बाय ३० मीटर क्षेत्रातील नमुने घेत हे काम केले. याद्वारे शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी आवश्‍यक जमिनीचा पोत, खोली, पीएच, सामू अशाप्रकारची माहिती देण्यात आली आहे. मातीचे आरोग्य तसेच इतर धोरणात्मक निर्णय घेताना या माहितीचा उपयोग होईल,’’ असे डॉ. पाटील म्हणाले.

सध्या अचूकता साधण्यासाठी अनेक बाबींचे पृथक्करण करावे लागते. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या काळात जमिनीबाबतची माहिती जाणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर केला जाईल. त्या दृष्टीने देखील संस्था प्रयत्नशील आहे. या जमीन नकाशाद्वारे जमिनीची संरचना, खोली, पोत सामू व वीज वाहकता यासह इतर गुणधर्माची माहिती कळण्यास मदत होईल.
डॉ. नितीन पाटील, संचालक, केंद्रीय मृदा विज्ञान व जमीन उपयोगिता संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT