Pune News : राज्य सरकारने जमिनीच्या सातबाऱ्याबाबत निर्णय घेतना आहे. आता अर्जदाराच्या नावाबरोबर आईच्या नावाचा समावेश करावा लागणार आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागास कार्यवाही करण्याच्या सूचना सरकारने दिल्या असून त्या सहा महिन्यांत अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदारासह आता त्याच्या आईचे नाव देखील लागणार आहे.
भूमी अभिलेख विभागाने सातबाऱ्यावर आईचे नाव लागण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रमाणे १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी करताना आईचे नाव लावावे लागणार आहे. तसेच ज्यांनी याच्या आधी खरेदी व्यवहार केला आहे. त्यांना देखील आईचे नाव लावने बंधनकारक करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे येथून पुढे आईचे नाव देखील सातबाऱ्यावर असणार आहे.
राज्य सरकारने काहीच महिन्यांच्या आधी वडिलांच्या नावाबरोबर आईचे नाव सरकारी कागदपत्रांमध्ये लावण्याचा निर्णय घेतला होता. महिला व बालकल्याण विभागाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नावाच्या पाटीवर आईचे नाव झळकले होते. तर याच निर्णयामुळे मुलाच्या शाळेच्या दाखवल्यावर आईचे नाव असणार आहे.
याच निर्णयाच्या धर्तीवर भूमी अभिलेख विभागाने निर्णय घेतला असून १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका घेण्यासाठी या नियमाचे पालन करावे लागणार आहे. तर अर्जदारासह आईचे नाव द्यावे लागणार आहे. सध्या या नियमानुसार संगणकप्रणाली अपडेट करण्याचे काम भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.
तीन ते सहा महिन्यांचा कालावधी
भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार आईचे नाव लावावे लागणार असून यात तांत्रिक अडचणी आहेत. या दूर करण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. कारण या निर्णयानुसार १ मे २०२४ जन्मलेल्या व्यक्तिच्या नावे मालमत्ता किंवा जमीन घेतल्यास आईचे नाव लावावे लागणार आहे.
यासाठी रेकॉर्ड तयार करताना सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये आईच्या नावाचा रकाना (कॉलम) नाही. तोच तयार करण्यासाठी कार्यप्रणाली (सिस्टीम) अपडेट करावी लागणार आहे. याला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी जाईल. यामुळेच सध्या जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे.
पुरावा द्यावा लागणार
या निर्णयानुसार १ मे २०२४ च्या आधीच्या व्यवहारात आईचे नाव लावण्यासाठी सदरची व्यक्ती त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. या पुराव्याची तलाठ्यामार्फत शहानिशा झाल्यानंतर तशी नोंद होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.