Land Acquisition : ‘भूसंपादनाच्या अडचणी १५ जूनपर्यंत सोडवाव्यात’

Collector Kumar Ashirwad : भूसंपादनविषयक अडचणी १५ जूनपर्यंत सोडविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
Land Acquisition
Land AcquisitionAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापुर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई महामार्ग, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, पालखी महामार्ग, सोलापूर-धाराशिव रेल्वे मार्ग, सोलापूरसाठी प्रस्तावित असलेली समांतर पाइपलाइन, नगर-करमाळा-टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापुरातील उड्डाण पुलाची कामे या पायाभूत प्रकल्पांची कामे विहित काल मर्यादित पूर्ण करावी लागणार आहेत,त्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या कामात असलेल्या भूसंपादनविषयक अडचणी १५ जूनपर्यंत सोडविण्यासाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन समिती सभागृहात आयोजित पायाभूत प्रकल्पातील भूसंपादन विषयक आढावा बैठकीत श्री. आशीर्वाद बोलत होते. या वेळी विशेष भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, भूसंपादन अधिकारी सुमीत शिंदे, भूसंपादन अधिकारी प्रमोद गायकवाड, भूसंपादन अधिकारी श्रावण क्षीरसागर, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, सदाशिव पडदुणे, विजया पांगारकर, प्रियांका आंबेकर, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक संजय कदम, केशव घोडके, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Land Acquisition
Land Acquisition : पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाला वाढीवर दर द्या

श्री. आशीर्वाद म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर भूसंपादनविषयक अडचणी येत आहेत, त्या संबंधित भूसंपादन अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी त्यावर मार्ग काढावा.’’

Land Acquisition
Land Dispute : कहाणी ‘हायवे टच’ घराची!

‘विशेष कॅम्प घ्या’

‘‘सुरत-चेन्नई महामार्गासाठी ६७८ प्रकरणांत एकूण ५३४ कोटींचा निधी भूसंपादनासाठी मंजूर झालेला आहे. त्या अनुषंगाने आजपर्यंत २९५ कोटींचे वाटप झालेले आहे. परंतु अक्कलकोट तालुक्यातील १७ गावांमधील शेतकरी, ग्रामस्थ भूसंपादनासाठी अर्ज करत नाहीत. त्याचप्रमाणे अक्कलकोटसह बार्शी, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर अशा चार तालुक्यांतील १७८ प्रकरणे प्रलंबित आहेत. या संबंधित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी विशेष कॅम्प लावावेत,’’ अशी सूचनाही आशीर्वाद यांनी केली.

‘‘कृष्णा-मराठवाडा’बाबत लक्ष द्या’

‘‘कृष्णा -मराठवाडा प्रकल्पातील धाराशिव जिल्ह्यातील ६०४ हेक्टर क्षेत्र भूसंपादन करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, उत्तर सोलापूर व करमाळा तालुक्यातील १२२ हेक्टर क्षेत्र भूसंपादनाबाबत कार्यवाही संबंधित विभागाने त्वरित पूर्ण करावी. तसेच यातील २८ हेक्टर क्षेत्र भूसंपादनाच्या अनुषंगाने खासगी वाटाघाटी करून कार्यवाही पूर्ण करावी,’’ अशा सूचना आशीर्वाद यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com