Akola Map : मानवी साखळीतून साकारला अकोल्याचा नकाशा

Voting Awareness : लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला.
Akola Map
Akola Map Agrowon

Akola News : मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रिया व मतदानाबाबत जागृती करण्यासाठी व अकोला मतदार संघात ७५ टक्क्यांवर मतदानाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत दोन हजार शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मतदार प्रतिज्ञा घेतली.

लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे झालेल्या या कार्यक्रमात मानवी साखळीतून अकोला जिल्ह्याचा नकाशा साकारण्यात आला.

Akola Map
Agriculture Road : शेतरस्त्याचा असा सुटला प्रश्‍न

जिल्हाधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Akola Map
Agriculture Plastic Technology : प्लॅस्टिक तंत्रज्ञानातून फळबागांचे संरक्षण

‘स्वीप’अंतर्गत नागरी भागाबरोबरच गावपातळीपर्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होत आहेत. मतदानाचे ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्व जण संघटित प्रयत्न करू व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान देऊया, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी या वेळी केले.

विविध अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांच्यासह नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अधिकाधिक मतदानाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार या वेळो उपस्थितांनी केला. मानवी साखळीबरोबरच ‘मैं भारत हूँ’या गीताचे प्रसारणही या वेळी करण्यात आले. समन्वय अधिकारी गजानन महल्ले, आर. जे. पल्लवी, आर. जे. दिव्या यांनी सूत्रसंचालन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com