Lumpy Skin Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Lumpy Skin Disease : कर्नावड येथे गायीला लम्पी स्कीनची लागण

Animal Disease : भोर तालुक्यातील कर्नावड येथील कुडपणेवाडी येथील रमेश कृष्णा भिलारे यांच्या गायीला ‘लम्पी’ची लागण झाली असून यावर पशुसंवर्धन विभागाने ताबडतोब उपचार करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Team Agrowon

Bhor News : भोर तालुक्यातील कर्नावड येथील कुडपणेवाडी येथील रमेश कृष्णा भिलारे यांच्या गायीला ‘लम्पी’ची लागण झाली असून यावर पशुसंवर्धन विभागाने ताबडतोब उपचार करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या आंबवडे खोऱ्यात लम्पीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या जिल्ह्यात लम्पीची साथ सुरू असून भोर तालुक्यात आंबवडे, शिरगाव, भोंगवली, खेड शिवापूर या गावांतून प्रत्येकी एक अशी चार जनावरे लम्पीमुळे दगावली आहेत. तालुक्यात ९० ते ९५ टक्के लम्पी प्रतिबंधक लसीकरण झाले असले तरी देखील हा आजार होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यात भोर तालुक्यात असणाऱ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे अतिरिक्त भार असल्याने तारांबळ होत आहे.

याबाबत तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. वर्षाराणी जाधव म्हणाल्या की, संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी करून उपचार करण्यात येतील. तसेच लंपीची लक्षणे असलेल्या जनावरांबाबत पशुवैद्यकास संपर्क साधून त्वरित औषधोपचार करून घ्यावेत. रोगप्रसारक किटकांसंदर्भात प्रतिबंधात्मक फवारणी करावी, बाधित पशुधन स्वतंत्र बांधावे, भांडी व चारा यांची सोय स्वतंत्र असावी.

इतर पशुपालकांच्या पशुधनाच्या संपर्कात येऊ नये, सामुहिक चराईस, पाणी स्रोताच्या ठिकाणी पाणी पाजावयास नेऊ नये. पशुसंवर्धन विभागाकडूनच उपचार करून घ्यावेत. रोग प्रतिकार शक्ती वाढीस पोषक आहार द्यावा, पशुधनाची वेळोवेळी पाहणी करावी, आजार झाकून ठेऊ नये तसेच असे आजार होऊ नये म्हणून पशुपालकांनी दक्षता घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT