Animal Care : पुण्यातील विभागीय पशुधन रोगनिदान प्रयोगशाळेचे नगरला स्थलांतर होणार

Livestock Laboratory : पशुधनाच्या आजाराचे वेळेत निदान व्हावे यासाठी पुणे येथे कार्यरत असलेल्या विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आता नगर येथे स्थलांतर होणार आहे.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

Nagar News : पशुधनाच्या आजाराचे वेळेत निदान व्हावे यासाठी पुणे येथे कार्यरत असलेल्या विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आता नगर येथे स्थलांतर होणार आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन असल्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. नगरच्या विभागीय प्रयोगशाळेत नगरसह सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील पशुधनाचे रोग निदानास मदत होणार आहे.

आतापर्यंत नगर जिल्ह्याचा नाशिक विभागीय प्रयोगशाळेत समावेश होता. नगरला ही प्रयोगशाळा होत असल्याने शेतकऱ्यांना अधिक मदत होणार आहे. पुण्याची विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा नगरला स्थलांतरित करताना अन्य विभागीय प्रयोगशाळेच्या कार्यक्षेत्रातही काहीसे बदल केले आहेत.

Animal Care
Animal Care : जनावरांचे वजन वाढ, वंशावळ निर्मितीकडे लक्ष देण्याची गरज

राज्यात शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करावे यासाठी सरकारी पातळीवरच प्रयत्न केले जातात. पशुधनाच्या आजाराचे वेळीच निदान होऊन त्यावर उपचार व्हावेत, पशुधनामध्ये येणाऱ्या साथीच्या रोगाची लक्षणे विचारात घेऊन सदर रोगाचे रोग निदान करून रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात ८ विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा आहेत. त्यापैकी पुणे विभागात पुणे व कोल्हापूर अशा २ प्रयोगशाळा कार्यान्वित असून, उर्वरित ६ प्रयोगशाळा नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर आणि चिपळूण येथे कार्यरत आहेत.

पुणे विभागात २ विभागीय प्रयोगशाळांशिवाय राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग असून विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग, या दोन्ही प्रयोगशाळा एकाच इमारतीत कार्यरत आहेत. दोन्ही प्रयोगशाळा एकाच इमारतीत असल्याने कामाचे विकेंद्रीकरण होत नव्हते. त्यात नगर जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार १८,४१,७७५ पशुधन आहेत. नगर जिल्ह्यातील पशुधनांची मागील तीन वर्षांत तपासणी करण्यात आलेल्या रोग नमुन्यांची संख्या जास्त आहे.

Animal Care
Animal Care : जातिवंत दुधाळ गोवंशाचे संगोपन

त्यामुळे नगर जिल्ह्यातील पशुधनास तत्काळ रोग निदानाची सुविधा उपलब्ध होण्याला मात्र काहिसा अवधी लागायचा. नगर जिल्ह्याचा समावेश नाशिक विभागीय प्रयोगशाळेत होता. नाशिक विभागीय प्रयोगशाळेच्या कार्यकक्षेत सुमारे ५० लाख २२ हजार ५७९ इतके पशुधन घटक येतात. सदर संख्या ही राज्यातील इतर प्रयोगशाळापेक्षा जास्त असल्याने आणि नगर जिल्ह्यात पशुधनाची संख्या अधिक असल्याने नाशिक विभागीय प्रयोगशाळेच्या कामकाजाची विभागणी होणे ही आवश्यक होते.

पुणे विभागात कार्यरत असलेल्या ३ पशुवैद्यकीय रोग निदान प्रयोगशाळा तसेच विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, नाशिक यांच्या अधिपत्याखालील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि नगर या जिल्ह्यातील पशुधनाची संख्या विचारात घेता, पुणे येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा नगर येथे स्थलांतरित करण्यात आली आहे.

श्वानप्रतिबंधक पथकासाठी पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातील प्रत्येकी १ पद वगळता उर्वरित पदांसह विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा स्थलांतरित करण्यात येणार आहे. श्वानप्रतिबंधक पथक हे राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग यांच्या अधिपत्याखाली असेल. नगर येथे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाच्या परिसरात ही प्रयोगशाळा होईल. याबाबत पशुसंवर्धन विभागाने आदेश काढले आहेत.

विभागीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळांचे कार्यक्षेत्र

नगर ः नगर, पुणे, सोलापूर

कोल्हापूर ः सांगली, सातारा कोल्हापूर

नाशिक ः धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक

छत्रपती संभाजीनगर, ः जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर

लातूर ः धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर

अकोला ः अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम

नागपूर ः गडचिरोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर

चिपळूण ः ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई उपनगर, मुंबई

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com