Election  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Teacher Constituency Election : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी ९३.४८ टक्के मतदान

Teacher Constituency Update : शिक्षक मतदारांना पैसे व ‘गिफ्ट’ वाटपामुळे राज्यभर चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी (ता. २६) सरासरी ९३.४८ टक्के मतदान झाले.

Team Agrowon

Nashik News : शिक्षक मतदारांना पैसे व ‘गिफ्ट’ वाटपामुळे राज्यभर चर्चेत राहिलेल्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी (ता. २६) सरासरी ९३.४८ टक्के मतदान झाले. नंदुरबार जिल्ह्यात (९६.१२ टक्के) सर्वाधिक, तर नाशिक जिल्ह्यात (९१.६३) सर्वांत कमी मतदान झाले.

शिक्षक मतदार संघातील नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत बुधवारी मतदान घेण्यात आले. पाचही जिल्ह्यांत एकूण ६९ हजार ३६८ मतदारांची नोंदणी झालेली असल्याने यंदा निवडणुकीत चुरस रंगल्याचे दिसून आले. एकूण ६४,८४६ मतदारांनी हक्क बजावला. मतदार संघातील २१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असून, सोमवारी (ता. १) नाशिकमध्ये मतमोजणी होणार आहे.

सर्वाधिक मतदार असलेल्या नाशिक जिल्ह्यातून महायुतीचे किशोर दराडे, महाविकास आघाडीचे अॅड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड, महेंद्र भावसार हे तीन तुल्यबळ उमेदवार रिंगणात होते. अहमदनगरमधील अपक्ष विवेक कोल्हे व भाऊसाहेब कचरे यांच्यात लढत रंगली.

दुपारी बी. डी. भालेकर शाळेतील मतदान केंद्राबाहेर नाशिक जिल्ह्यातील एका उमेदवाराच्या नावाने मतदारांना पैसे वाटणाऱ्या विलास नरवडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्याला पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांनी पंचनामा नोंदविला. या घटनेव्यतिरिक्त मतदान शांततेत पार पडले.

विभागातील पाचही जिल्ह्यांत ९० मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली. संपूर्ण मतदार संघात २२ हजार ८६५ महिलांपैकी २१ हजार १२४ महिलांनी (९२ टक्के), तर ४६ हजार ५०३ पुरुषांपैकी ४३ हजार ७२२ मतदारांनी हक्क बजावला. मतदान केंद्रात पिण्यासाठी पाणी, बसण्यासाठी खुर्चा किंवा बाकही नसल्याने तासनतास रांगेत उभे राहावे लागले. मतदानासाठी वेळ लागत असल्याचे कानावर पडताच काही मतदार घराबाहेरच पडले नाहीत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरल्याचे बोलले जाते. महायुतीसह ‘मविआ’ व अपक्ष उमेदवारांनी नाशिक शहरातील मतदान केंद्रांना भेट दिली. उशिरा आल्याने व वेळ संपल्याने काही मतदारांना कर्मचाऱ्यांनी परत पाठविले.

जिल्हानिहाय मतदान

नंदुरबार ९६.१२

जळगाव ९५.२६

अहमदनगर ९३.८८

धुळे ९३.७७

नाशिक ९१.६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

Rabi Crop Demonstration : तेलबिया उत्पादनाचे रब्बीत १७,८०० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Distillery Project : आसवनी प्रकल्पांच्या पाण्याचे वर्गीकरण वादात

Malegaon Sugar Factory : ‘माळेगाव’चे १५ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट

Quality Control Department Issue : ‘गुणनियंत्रण’च्या बदल्यांसाठी समुपदेशन हाच एकमेव पर्याय

SCROLL FOR NEXT