Thane News: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निधीवरून मोठा आर्थिक आणि प्रशासकीय गोंधळ उघडकीस आला आहे. उपक्रमांसाठी आलेला तब्बल चार लाख रुपयांचा निधी वेळेत खर्च न झाल्याने तो सरकारला परत गेला आहे. या हलगर्जीपणाबद्दल प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्यासह लेखा व्यवस्थापक आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रांमधील डेटा एंट्री ऑपरेटर्सना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे..राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत १० ऑक्टोबरपासून ‘स्टेट नोडल अकाउंट’ ही नवीन प्रणाली लागू करण्यात आली. या प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वी जुन्या खात्यातील सर्व निधी खर्च करण्याच्या स्पष्ट सूचना राज्य स्तरावरून देण्यात आल्या होत्या. यासाठी ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत संस्था स्तरावर निर्देशही वारंवार देण्यात आले होते. मात्र, कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासनाने १ नोव्हेंबर रोजी सर्व निधी खर्च झाल्याचे प्रमाणपत्र सरकारला सादर केले. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत निधी शिल्लक असल्याचे आढळल्याने सरकारने ती रक्कम परत घेतली आहे..National Pulses Mission : राष्ट्रीय कडधान्य धोरणाची वास्तविकता.तथापि, नागरिकांच्या आरोग्यासाठी असलेला निधी वेळेत व नियमानुसार खर्च न होता परत जाणे, तसेच चुकीची माहिती देऊन प्रमाणपत्र सादर होणे, या बाबींमुळे कल्याण-डोंबिवली पालिका आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या प्रकरणातील चौकशीचा निष्कर्ष काय लागतो याकडे लक्ष लागले आहे..National Live Stock Mission: कमी होत चाललेली गाढवं, घोडे आणि उंट वाचवण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल.आरोग्य विभागाची सारवासारवपालिकेच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, नागरी आरोग्य केंद्र स्तरावर केलेल्या कारवाईत तांत्रिक त्रुटी रहील्याने ही परिस्थिती निर्माण झाली. परत गेलेला निधी पुन्हा मिळवण्यासाठीराज्य स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेऊ, असा खुलासाही त्यांनी सरकारकडे सादर केला आहे..आरोग्याशी खेळनिधी परत जाण्याबरोबरच, नवीन प्रणाली लागू झालेली असतानाही २१ नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत जुन्या खात्यातून नियमबाह्य व्यवहार करण्यात आले. ही बाब लक्षात येताच सरकारकडून याबाबत सखोल खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच, हा प्रकार अत्यंत गंभीर आर्थिक व प्रशासकीय हलगर्जीपणा असल्याचे ताशेरे सरकारने पालिकेवर ओढले आहेत. यामुळे दोषींवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे..प्रशासकीय कारवाईचा इशाराराष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वित्त व लेखा संचालक क्षमा पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. याप्रकरणी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसेल, तर संबंधित दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.